Home | Business | Auto | motor insurance: low price most securtiy

वाहन विम्याचा हप्ता: कमी पैशात मिळवा अधिक सुरक्षितता

राजेश विक्रांत | Update - Jun 09, 2011, 02:28 AM IST

तुम्हाला लाल रंगाची गाडी कितीही पसंत असो, पण विमा कंपनी त्या रंगासाठी जास्त हप्ता वसूल करते

 • motor insurance: low price most securtiy

  मुंबई- मोटार वाहन कायद्यानुसार सर्व वाहन मालकांनी थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर घेणे अनिवार्य आहे. दरवर्षी लाखो लोक रस्त्यांवर होणा-या अपघातांत जीव गमावतात. वाहन विम्यात जीवन विमा आणि आरोग्य विम्यात संरक्षण नसणाºया नुकसानीलाही संरक्षण दिलेले असते.

  नवीन बदल : सध्या वाहन विम्याच्या क्षेत्रात खूप बदल होत आहेत. वाहन विमा क्षेत्राच्या मूलभूत आराखड्यात बदल झालेले नसले तरी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (इर्डा) पुढाकाराने वाहन विम्यात अनेक सुविधांची वाढ झाली आहे. वाहन विम्यात अनेक अतिरिक्त कव्हर/अ‍ॅड आॅन घेऊन कमीत कमी पैशात जास्तीत जास्त संरक्षण मिळवता येते.

  हप्ता कसा ठरतो : तुम्ही भरीत असलेला हप्ता कशाप्रकारे ठरला आहे ते विम्याच्या मूळ आराखड्यात तपासून पाहा. सध्या ४ घटक विचारात घेतले जातात- १. इन्शुअर्ड डी लेअर्ड व्हॅल्यू (आयव्हीडी), २. भौगोलिक क्षेत्र (वाहन नोंदणीचे क्षेत्र) ३. वाहनाची क्षमता आणि ४. वाहनाचे वय. विमा कंपन्या याच घटकांचा विचार करून हप्त्याची रक्कम ठरवतात.

  भडक रंगाच्या वाहनांचा हप्ता जास्त : भडक रंगाचे वाहन निवडताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. वाहनांच्या अशा रंगांमुळे विम्याचा हप्ता वाढू शकतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी असल्याने तुम्हाला लाल रंगाची गाडी कितीही पसंत असो, पण विमा कंपनी त्या रंगासाठी जास्त हप्ता वसूल करते. लाल, मातकट आणि निळा हे रंग ‘पुअर व्हिजिबिलिटीत’ मोडत असल्याने या रंगाच्या गाड्यांचे अपघात होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे या रंगांच्या गाड्यांच्या विम्याचा हप्ताही जास्त असतो.

  चोरी प्रतिबंधक उपकरण : सेंट्रल लॉकिंग सिस्टीम किंवा अलार्मसारखी चोरी प्रतिबंधक उपकरणे कारमध्ये लावल्यास विमा कंपन्या हप्त्यात २.५० टक्के किंवा कमाल २५० रुपयांची सूट देऊ शकतात.

  नो क्लेम बोनस : वर्षभरादरम्यान कोणताही क्लेम केला नसेल तर पॉलिसीचे नूतनीकरण करताना वाहन विमा कंपनीकडून नो क्लेम बोनस किंवा एनसीबी मिळते. ही रक्कम हप्त्याच्या २० ते ५० टक्क्यांपर्यंत असते.

  सदस्यता : तुम्ही आॅटोमोबाइल असोसिएशन आॅफ इंडिया किंवा वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाइल असोसिएशनसारख्या मान्यताप्राप्त वाहन संघटनेचे सदस्य असाल तर विमा तुम्हाला विमा कंपन्यांकडून वाहन विम्याच्या हप्त्यात ५ टक्के किंवा कमाल २०० रुपयांची सूट मिळू शकते.

Trending