'मोटोरोला'ने आज (शुक्रवार) भारतीय बाजारात तीन गॅजेट्स लॉन्च केले आहेत. यात मोटो G(2) आणि मोटो X (सेकंड जनरेशन) हे दोन स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच 'मोटो 360'चा समावेश आहे. 'मोटो 360' ही मोटोरोलाची पहिला स्मार्टवॉच असून ती अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते.
मोटोरोलाने सादर केलेले तिन्ही गॅजेट्स इम्प्रूव्ड फीचर्सने अद्ययावत आहेत. विशेष म्हणजे हे गॅजेट्स वॉटरप्रूफ आहेत. दरम्यान,
सोनी कंपनीनेही नुकतेच
स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच सादर केले आहेत.
आपले प्रॉडक्ट्स वॉटरप्रुफ असल्याचा सोनीने दावा केला आहे.
फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल मोटो G(2)
बिग डिस्प्ले स्क्रीनने परिपूर्ण असलेल्या मोटो G(2) स्मार्टफोन कॉमर्स साइट 'फ्लिपकार्ट'वर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मोटो G(2)ची किमत 12999 रुपये आहे. मात्र, मोटो X(2) आणि मोटो 360 च्या किमतीबाबत कंपनीने खुलासा केलेला नाही. मोटोरोलाचे तिन्ही गॅजेट्स या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होती. मोटो X(2) हा स्मार्टफोनची अमेरिकन बाजारात 499 डॉलर्स (जवळपास 30 हजार रुपये) किमत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, मोटोच्या तिन्ही गॅजेट्सची स्पेसिफिकेशन्स...
(फोटो: डाव्याबाजुला मोटो X(2), मोटो 360 आणि मोटो G(2))