आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Moto G च्या 4G व्हेरिएंटचे स्पेसिफिकेशन इंटरनेटवर लीक; वाचा लीक झालेले फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Motorola लवकरच आपला लोकप्रिय स्मार्टफोन Moto G चे नवे व्हेरिएंट सादर करणार आहे. Moto G सेकंड जनरेशन लॉन्च झाल्यानंतर या फोनच्या 4G व्हेरिएंटबाबत चर्चेला उधाण आले होते. मात्र, त्यानंतर कंपनीतर्फे कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. आता मात्र, Moto G चे 4G व्हेरिएंट लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, Motorola कंपनीने ब्राजीलच्या वेबसाइटवर आपल्या Moto G च्या 4G व्हेरिएंटचे फीचर्सबाबत माहिती पोस्ट केली आहे. Moto G च्या न्यू व्हेरिएंटमध्ये पॉवरफूल बॅटरी वापरण्यात आली आहे. तसेच 4G मध्ये LTE फीचर्स देण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर कंपनीने पोस्ट डिलिट केली आहे.
फोनची लिस्टिंग Droid Life वेबसाइटवर लीक झाली होती. 4G सेवा अजून भारतात मोजक्याच शहरात उपलब्ध आहे. रिलायन्स, एअरटेलसारख्या टेलिकॉम ऑपरेटर कंपन्या 4Gवर काम करत आहेत.
भारतीय बाजारात मायक्रोमॅक्स, सॅमसंग आणि जिओमीसारख्या स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांनी यापूर्वीच 4G गॅजेट लॉन्च केले आहेत.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, Moto Gच्या 4G व्हेरिएंटचे लीक झालेले फीचर्स...