आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Move Over Skype Awaaz Is New Voice Calling Tablet

'स्काइप'ला टक्कर देईल ही देशी अॅप; देशभरात देणार फ्री कॉलिंग सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मायक्रोसॉफ्ट'ची व्हिडिओ कॉलिंग अॅप 'स्काइप'ला एक भारतीय अॅप टक्कर देऊ शकते. 'आवाज' असे या अॅपचे नाव असून वाय-फाय नेटवर्कच्या माध्यमातून यूजर्सला फ्री कॉलिंग सेवा पुरविते.

'आवाज' हे स्मार्टफोनसाठी एक प्लगइनसारखे कार्य करते. सेल्युलर नेटवर्कचा वापर न करता यूजर्सला कॉल कनेक्ट सुविधा देते. मात्र, यासाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये 'आवाज' प्लगइन असणे आवश्यक आहे.

2003 बॅचचा BITचा विद्यार्थी अनुज जैन यांनी हे अॅप तयार केले आहे. अनुज यांनी एकदा घराच्या बेसमेंटच्या डागडूजीचे काम काढले होते. यामुळे त्यांना घरच्या मंडळींना वारंवार फोन करावा लागत होता. त्यांच्या घरी वाय-फाय नेटवर्क असल्याने फोन करण्यासाठी त्यांनी 'आवाज'चे डिझाइन तयार केले. सेल्युलर नेटवर्कचा वापर न करता 'आवाज'मध्ये कॉल करण्याचे फीचर्स विकसित करण्यात आले आहे.

अनुज यांनी या अॅपसाठी ओपस कोडॅक (Opus codec) व्हॉइस कंप्रेशन तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रायव्हेट कॉल्स कोणीही हॅक करण्‍याचा प्रयत्न केला तरी त्याला यूजर्सची माहिती मिळत नाही.