Home »Business »Gadget» Movelable Smart Phone

आता घडी घालता येणारा स्मार्ट फोन

भास्कर न्यूज नेटवर्क | Jan 07, 2013, 11:21 AM IST

  • आता घडी घालता येणारा स्मार्ट फोन

या वर्षात तंत्रज्ञान क्षेत्राच्या बाजारात सर्वात जास्त उत्सुकतेने वाट पाहिली जात असलेले गॅजेट म्हणजे ‘बेंडी स्क्रीन स्मार्ट फोन’ (दुमडता येणारा फोन). हा गॅजेट मोबाइल मार्केटमध्ये सर्वात जास्त धमाल उडवेल अशी आशा आहे. हा फोन असा असेल जो वाकवून इतर कामासाठीसुद्धा वापरता येईल. हातोडीने मारल्यानंतरही या स्क्रीनचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी सँमसंगकंपनी प्रयत्न करत आहेत. यामध्ये 8003480 रिझोल्युशन असणारे अ‍ॅमोलेड स्क्रीन, एक जीबी रॅम आणि 1.2 गीगा हॅर्ट्झचा प्रोसेसर असणार आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरासुद्धा असेल.

फुजीत्सू लाइट बुक
2013 मध्ये फुजीत्सू लाइट बुक टेक्नोसॅवी लोकांच्या पसंतीस खरा उतरेल. या आधुनिक उपकरणाच्या मदतीने ग्राहक कॅमेरा, फोन करण्याची सुविधा आणि लॅपटॉप या तिन्ही सेवांचा वापर करू शकतील. कॅमेरा आणि लॅपटॉप वेगळेवेगळे वापरायचे असल्यास तोसुद्धा वेगळे करून वापरता येतील. तसेच सेल्युलर मोडम म्हणून याचा वापर करता येईल.

रिस्ट बेसिस बँड
हे उपकरण आरोग्याची काळजी घेणार्‍यांसाठी लाभदायी आहे. व्यक्तीच्या हातावर बांधता येईल अशा स्वरूपात हे उपकरण असेल, याच्या मदतीने शरीरातील हृदयगती, कॅलरीज, झोपण्याची वेळ, रक्तदाब, तापमान याची माहिती घेता येईल. या उपकरणाच्या मदतीने व्यक्तीला दररोज स्वत:च्या प्रकृतीची माहिती घेणे शक्य होणार आहे.

अँपल आय टीव्ही
यावर्षी अँपल कंपनी टीव्हीच्या व्यवसायात आगमन करणार आहे. 50 इंच स्क्रीन आणि रॅटिना डिस्प्लेसारख्या उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणे अँपलचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

आयपॅड मिनी
अँपल 7 इंची मिनी आयपॅड बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यात रॅटिना डिस्प्लेसह आयओएस-6 आणि डबल कॅमेरा अशा सुविधा असतील.

Next Article

Recommended