फायरफॉक्स वेब ब्राऊझर तयार करणाऱ्या मोझिला या कंपनीने इंटेक्स आणि स्पाईस या कंपन्यांसोबत करार केला असून भारत आणि चीनसह विकसित देशांमध्ये अत्यल्प दरात स्मार्टफोन लॉंच करणार आहे. यामुळे नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचे प्लॅनिंग करीत असलेल्या युजर्ससाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. या फोनच्या आगमनाने भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेतही अमुलाग्र बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बार्सिलोना येथे नुकत्याच झालेल्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये मोझिलाने 25 अमेरिकी डॉलर किमतीच्या स्मार्टफोनचे मॉडेल सादर केले होते. भारत आणि चीनसह विकसित देशांमध्ये हा मोबाईल लॉंच केला जाणार आहे, असेही यावेळी सांगितले होते.
गुगलच्या अॅंड्राईट आणि
मायक्रोसॉफ्टच्या विंडोज या ऑपरेटिंग सिस्टिमला हा मोबाईल टक्कर देणार आहे. यात मोझिला फायरफॉक्सची ओएस राहणार आहे.
यासंदर्भात मोझिलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ली गोंग यांनी सांगितले, की लोकांच्या हातात वेबची ताकत ठेवण्यासाठी मोझिला कंपनी कटिबद्ध आहे. फायरफॉक्स ही ओएस ग्राहक, डेव्हलपर, मोबाईल प्रोव्हायडर आणि मॅन्युफॅक्चरर यांना ऑनलाईन स्वातंत्र्य प्रदान करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी आम्ही इंटेक्स आणि स्पाईस या कंपन्यांच्या मदतीने विकसित देशांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून प्रवेश करणार आहोत. युजर्सना जास्त स्वातंत्र्य देणारी आमची ओएस असेल.
या स्मार्टफोनची संभाव्य छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर...