आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोजिला लॉन्‍च करणार 'सर्वांत स्‍वस्‍त' स्‍मार्टफोन, किंमत असेल 1550 रुपये.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकसनशील देशातील उभरत्‍या अर्थव्‍यवस्‍थेकडे लक्ष देऊन मोजिला वेब ब्राउजर्स कपंनी बाजारपेठेमध्‍ये सर्वात स्‍वस्‍त स्‍मार्टफोन लॉन्‍च करणार आहे.

फायरफॉक्‍स ब्राऊजरसाठी मोजिला कंपनीला ओळखले जाते. सर्वांधीक स्‍वस्‍त उत्‍पादन तयार करणारी चीनी कंपनी 'स्‍प्रेडट्रम'सोबत भागीदारी करून स्‍मार्टफोन तयार करणार आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये विविध अप्लिकेशन असून त्‍यामध्‍ये इंटरनेट सुविधाही असणार आहे.
हा स्‍मार्टफोन लोकप्रिय होणार असल्‍याचे भाकीत विश्‍लेषकांनी केले आहे. बाजारपेठेमध्‍ये या स्‍मार्टफोनमुळे खळबळ उडेल आणि या कंपनीचा ब्रॅड तयार हाईल. बाजारपेठेमध्‍ये या स्‍मार्टफोनला मोठी टक्‍कर मिळेल कारण बार्सिलोनामध्‍ये 'मोबाईल वर्ल्‍ड कॉंग्रेस' मध्‍ये स्‍वस्‍तात स्‍मार्टफोन निर्माण करण्‍याचा घोषणा होऊ शकतात, असेही मत जागतिक बाजारपेठ विश्‍लेषकांनी मांडले आहे.
--
वाढती स्‍पर्धा
मोजिलाच्‍या अधिका-याने सां‍गितले, की बाजारपेठेत हा स्‍मार्टफोन खळबळ माजवेल. विकसनशिल देशांमध्‍ये कमी किमतीच्‍या स्‍मार्टफोनला जास्‍त मागणी आहे.त्‍यामुळे या स्‍मार्टफोनचा खप मोठ्या प्रमाणावर होईल असा अंदाज व्‍यक्‍त केल्‍या जात
कतारच्‍ो विश्‍लेषक कॅरोलिन मिलानेसी यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार या स्‍मार्टफोनला बाजारपेठेतील स्‍पर्धक मानू नये. ते म्‍हणाले, की '' या स्‍मार्टफोनला फीचरफोन म्‍हणून बघायला हवे. प्राथमिक स्थितीत कॉल आणि मॅसेजसाठी हा स्‍मार्टफोन जास्‍त उपयुक्‍त ठरणार आहे.
दीड हजार रुपयांमध्‍ये मोजिलापेक्षा जास्‍त सुविधा देणारे स्‍मार्टफोन बाजारात आले आहेत. त्‍यामध्‍ये हुआवेई आणि जेडटीई सारखे फोन आहेत.