आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमएसएमईसाठी ३० कोटींची गुंतवणूक आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लघुउद्योगांसाठी केंद्र सरकार लवकरच नवीन कायदा अाणण्याच्या तयारीत आहे. नव्या कायद्यानुसार प्लांट आणि मशिनरीमध्ये ३० कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करणारे व्यावसायिक एमएसएमई (सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग) क्षेत्रात उतरू शकतात. लघु उद्योग मंत्रालयाने यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. मंत्रालयाच्या या प्रस्तावाला संसदेत मंजुरी मिळाल्यास उत्पादन सर्व्हिस क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या लाखो नवीन व्यावसायिकांना एमएसएमई क्षेत्रात येऊन त्यासंबंधीच्या सुविधांचा लाभ घेता येईल.

मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एमएसएईडी अॅक्ट २००६ मध्ये काही दुरुस्ती करून एमएसएमईडी अॅक्ट २०१४ अस्तित्वात आणला जाणार आहे. यात उत्पादन सेवा क्षेत्रांसाठी दोन प्रवर्ग बनवण्यात आले आहेत. या सर्व प्रवर्गांसाठी प्लांट मशीनरीसाठी गुंतवणुकीची मर्यादा तीन पटींनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. मंत्रालयाने यासंबंधी लोकांची मते मागवली असून त्यानंतर हा प्रस्ताव संसदेत मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.