आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानी बंधूंमधील करार: नात्याची ओढ नव्हे तर व्यावसायिक नाइलाज!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुकेश आणि अनिल अंबानी या दोन्ही भावांनी व्यावसायिक गरजेचा नाइलाज असल्याने तब्बल आठ वर्षांनंतर हातमिळवणी केली. अनिल यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन (आर कॉम) च्या 1.2 लाख किलोमीटर लांब ऑप्टिकल फायबर लाइनच्या माध्यमातून 4 जी ब्रॉडबँड सेवा पुरवण्याच्या बदल्यात, मुकेश यांची रिलायन्स जिओ आर कॉमला 1200 कोटी रुपये देईल. या करारामुळे दोन्ही कंपन्यांना फायदा होणार आहेच, पण मुकेश यांच्यापेक्षा या कराराची अनिल यांना सर्वाधिक गरज होती. गॅसच्या किमतीवरून गेली अनेक वर्षे कायदेशीर लढाईत ज्याने अडकवून ठेवले, त्या भावाशी मुकेश यांना हातमिळवणी करावी लागली.

2005 मध्ये वाटणी झाल्यावर मुकेश यांच्या कंपन्यांनी प्रगतीची शिखरे गाठली, तर अनिल यांच्या कंपनीला एकामागून एक धक्के लागत गेले. गेल्या महिन्यात तर एका आठवड्यातच अनिल यांच्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन (शेअर्सची एकूण किंमत) 10,000 कोटींनी ढासळली.

आरकॉमने एअरटेलसारख्या मोठ्या दूरसंचार कंपन्यांवर अनेक प्रकरणांमध्ये खटले भरल्याने या कंपन्या अनिल यांच्यावर नाराज होत्या. स्टॉक मार्केटचे विशेषज्ञ एस. पी. तुलस्यान यांच्या मते टेलिकॉम क्षेत्रात आर कॉम जणू अस्पृश्य बनली होती. आर कॉमकडे अतिरिक्त ऑप्टिकल फायबर होते, टॉवर होते, पण ग्राहक नव्हते. मुकेश यांच्याशी ऑप्टिकल फायबर आणि टॉवरचा करार केल्याने खरा फायदा अनिल यांनाच झाला आहे.

दुसरीकडे महेंद्र नाहटांकडून 4 जी ब्रॉडबँडचा परवाना विकत घेतल्यानंतर मुकेश यांना ऑप्टिकल फायबर आणि टॉवर हवे होते. स्वत:चे नेटवर्क उभे करण्यासाठी तीन वर्षे लागली असती. पण या वर्षाच्या अखेरीस 4 जी सेवा लाँच करण्याचा त्यांचा मानस होता. अशा परिस्थितीत गरज होती पूर्णपणे तयार नेटवर्कची.

संपूर्ण देशभरात बीएसएनएलच्या (3 लाख किलोमीटर) ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या खालोखाल आर कॉमचे नेटवर्क सर्वात मोठे आहे. देशातील सर्वात मोठी खासगी दूरसंचार कंपनी एअरटेलचे नेटवर्कही फक्त 80 हजार किलोमीटर एवढेच आहे. बीएसएनएलचे नेटवर्क मोठे असले तरी त्याचा लाभ खासगी कंपन्यांना दिला जात नाही. अशात मुकेश यांची सगळी भिस्त अनिल यांच्यावरच होती.

मॉर्गन स्टॅनलीचे अ‍ॅनलिस्ट विनय जयसिंह यांच्या अहवालानुसार आर कॉम कंपनी मुकेश यांनीच स्थापन केली आणि जोपासली होती. त्यामुळे या कंपनीच्या सर्व लहानसहान बाबी त्यांच्या कर्मचार्‍यांना ठाऊक
आहेत. एअरटेलसारख्या इतर कंपनीचे नेटवर्क वापरताना मात्र त्यांनी कंपनीकडून मिळणार्‍या माहितीवर विसंबून राहावे लागले असते. अनिल आणि मुकेश यांच्यात झालेल्या करारानुसार आता जिओ कंपनी टाकत असलेल्या ऑप्टिकल फायबर लाइनचा वापर आर कॉमलाही करता येईल.

अंबानी बंधूंकडे किती संपत्ती आहे हे माहीत करून घेण्‍यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...