आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंतीत मुकेश अंबानी सलग सहाव्या वर्षी टॉपवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी 21.5 दशलक्ष डॉलरच्या निव्वळ संपत्तीची नोंद करत देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट सलग सहाव्या वर्षी कायम ठेवला आहे. ‘फोर्ब्ज’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या यादीत मॅक्सिकोमधील कार्लोस स्लिम यांनी 73 अब्ज डॉलरच्या संपत्तीची नोंद करीत सलग
चौथ्या वर्षी जगातील श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला आहे.

जगातील अब्जोपतींच्या यादीत मुकेश अंबानी हे 22 व्या स्थानावर आहेत. पोलाद सम्राट लक्ष्मी मित्तल हे 16.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह या यादीत 41 व्या क्रमांकावर आहेत. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत कार्लोस स्लिम हे अव्वल स्थानी असून दुसरा क्रमांक बिल गेट्स (67 अब्ज डॉलर) यांना स्थान मिळाले आहे. त्या पाठोपाठ स्पेनच्या अ‍ॅमॅनसियो ऑर्टेगा (57 अब्ज डॉलर), वॉरन बफे (53.5 अब्ज डॉलर) आणि लॅरी एलिसन (43 अब्ज डॉलर) यांचा क्रमांक लागला आहे.

किमान एक अब्ज डॉलर इतकी निव्वळ संपत्ती असलेल्या जगातल्या एकूण 1 हजार 426 अब्जोपतींच्या यादीत भारतातल्या 55 अब्जाधीशांचा समावेश आहे.
भारतातील अब्जाधीशांची क्रमवारी अशी : मुकेश अंबानी, लक्ष्मी मित्तल, अझिम प्रेमजी, दिलीप संघवी, शशी आणि रवी रुईया, कुमार मंगलम बिर्ला, सावित्री जिंदाल, सुनील मित्तल, शिव नाडर, के. पी. सिंग, अनिल अंबानी.