आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांनो वर्षभर थांबल्यास धनलाभ शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंतवणूकदारांची एक मनस्वी इच्छा होती, ती म्हणजे, होलिकामातेने होळी, रंगपंचमी आणि गुढीपाडवा तसेच राजकीय परिवर्तनाच्या आधारावर गुंतवणूकदारांची सर्व संकटे यंदाच्या होळीत भस्मसात होऊन प्रत्येकाला भांडवलवाढीचा प्रसाद मिळण्याची. भारतीय शेअरबाजारात नवीन उच्चांक प्रस्थापित होत आहेत, देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे, ही मानसिकता गुंतवणूकदारांच्या मनात सन 2008 पासून घर करून आहे. तरीही शेअरबाजार उच्चांक करतो, याला आर्थिक कोडे म्हणायचे का ? परकीय गुंतवणूकदार भारतात पैसा ओतत आहेत आणि आपण पैसे काढतो आहोत. आज परकीय गुंतवणूकदारांचे सेन्सेक्स कंपन्यांत हे प्रमाण 26 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. प्रवर्तकांकडे 50-55 टक्के, बॅँका आणि इतर संस्था तसेच सरकार यांचे सेन्सेक्स कंपन्यांत 2-3 टक्केसुद्धा नाही.

दोन वर्षांत बाजारात किमान 40-50 टक्के भांडवलवृद्धी होते : मूल्य आणि किंमत यातील फरक ज्यांना कळतो तेच आता बाजारात आहेत. सन 1991 पासूनच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पुढील वर्ष, दोन वर्षांत बाजारात किमान 40-50 टक्के भांडवलवृद्धी होते. सध्या बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य ( मार्केट कॅप) आणि जीडीपी यात सुमारे 35 हजार कोटींची तफावत आहे. म्हणजेच पुढील वर्षा दोन वर्षांत 50 टक्के भांडवलवृद्धी शक्य आहे. सन 2007-08 मध्ये बाजारात 1 रुपया कमवण्यासाठी किमान 26 मोजावे लागत होते ते आता फक्त 16 रुपये मोजावे लागतात. गुंतवणुकीच्या भाषेत ज्याला पी.ई.रेशो ( प्राइज टु अर्निंग) म्हणतात.

प्राइज टु बुक याच काळात 7 वरून आता 3 वर आला : गुंतवणूकदारांना सांगावेसे वाटते की, सन 2007-08 ला 26 रुपये देऊन खरेदी केलेली गुंतवणूक 16 रुपयांना विक्री करणे योग्य आहे का? प्राइज टु बुक याच काळात 7 वरून आता 3 वर आला आहे. म्हणजेच, सन 2007-08 ला 1 रुपये मूल्य असलेल्या शेअर्सला 7 रुपये मोजावयाचे आणि आता त्यासाठी फक्त 3 रुपये मोजावे लागतात. मग आता घ्यायचे का विकायचे हे आपणच ठरवायचे आहे. सन 2007-08 मध्ये बाजारात डिफेन्सिव्ह आणि सायक्लिकलसाठी पी.ई.रद्द होता तो आता डिफेन्सिव्ह 20 आहे आणि सायक्लिकलचा 12 आहे. मीडकॅप आणि स्मॉलकॅप, लार्ज कॅपच्या तुलनेने जवळपास 40 टक्के स्वस्त आहे.

भांडवलाची सुरक्षा अथवा भांडवलवृद्धी यातील समतोल साधणे हेच यशाचे गमक : राग, प्रेम, हताश, निराश ह्या आवेगांमुळे निर्णय चुकतात. परिस्थितीनुसार स्वत:ला बदलणे, गुंतवणूक संरचना भविष्याच्या दृष्टीने घडवणे, संवादक्षमता वाढवून वास्तविकता समजून घेणे, बदलत्या परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल घडवणे हे सगळे ‘ इमोशनल इंटेलिजीयन्स’ चे प्रकार समजून घेऊन महागाईला नामोहरम करण्याची भांडवलवृद्धी प्रस्ताव देणार्‍या योजना समजून घेऊन त्यांना देकार देणे ही आत्ताची गरज आहे. भांडवलाची सुरक्षा अथवा भांडवलवृद्धी यातील फरक आणि आवश्यकता समजून घेऊन यांचा समतोल साधणे हेच यशाचे गमक आहे.