आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काउंटरवर मल्टी सिम अन् थ्रीजी फोनचीच चलती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- अन्न, वस्त्र, निवारा अन् मोबाइल... ही आधुनिक मानवाची जगण्याची गरज झाली आहे. याचेच प्रत्यंतर भारतातील मोबाइल विक्रीच्या तडाखेबंद खपावरून येते. यंदाच्या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत देशात तब्बल 5.02 कोटी मोबाइल हँडसेट्सची विक्री झाली आहे. सायबर मीडिया रिसर्च इंडिया मासिक मोबाइल हँडसेट मार्केट आढाव्यात पहिल्या तिमाहीतील मोबाइल हँडसेट विक्रीची आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
अहवालानुसार, मोबाइल निर्मात्यांनी अँड्रॉइड फोनच्या निर्मितीवर विशेष लक्ष दिले आहे. विशेष म्हणजे ड्युअल आणि मल्टी सिम कार्ड वापरण्याची सुविधा असलेल्या हँडसेट्ची विक्री आणि मागणी सातत्याने वाढत आहे. यंदा भारतात आयात केलेल्या एकूण फोनपैकी 67.7 टक्के फोन मल्टी सिम सुविधा असलेले होते. याशिवाय पहिल्या तिमाहीत तब्बल 47 लाख थ्रीजी सुविधायुक्त हँडसेट्ची आयात करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 34.3 टक्क्यांनी अधिक आहे. मात्र आॅक्टोबर-डिसेंबर 2011 कालावधीत थ्रीजी हँडसेट्ची विक्री 7.8 टक्क्यांनी घटल्याचेही अहवालात नमूद आहे.
मोबाइलच्या विक्रीत नोकियाने पहिला क्रमांक कायम राखला आहे. पहिल्या तिमाहीत नोकियाने बाजारपेठेत 23 हिस्सेदारीवर कब्जा मिळवला आहे. सेल्स युनिट शिपमेंटच्या आकडेवारीनुसार 14.1 टक्क्यांसह सॅमसंग दुसºया क्रमांकावर आहे. मायक्रोमॅक्सने दिग्गज कंपन्यांना मागे सारत बाजारात 5.02 टक्के वाट्यासह तिसरा क्रमांक पटकावला आहे.
पहिल्या तिमाहीत भारतात एकूण 27 लाख स्मार्टफोनची विक्री झाली आहे. मात्र या विभागात नोकियाला पछाडत सॅमसंग सर्वात लोकप्रिय बँ्रड ठरला आहे.
पहिल्या तिमाहीत विकलेल्या एकूण स्मार्टफोनमध्ये सॅमसंगने तब्बल 40.04 टक्के वाटा राखला आहे. या कॅटेगिरीत नोकियाची हिस्सेदारी 25.5, ब्लॅकबेरीचे निर्माता रिसर्च इन मोशनचा (रिम) वाटा 12.3 टक्के इतका आहे. यंदा जानेवारी ते मार्च कालावधीत भारतीय बाजारात सॅमसंगने सात स्मार्टफोन लाँच केले. 7,500 ते 27,000 रुपयांच्या दरम्यान किंमत असलेले स्मार्टफोन बाजारात सॅमसंगने घट्ट पाय रोवले आहेत. या उत्पादनांत सॅमसंगच्या गॅलेक्झी नोट फोनचा समावेश नाही. 5 इंचांची स्क्रीन असलेल्या या फोनला मीडिया टॅब्लेट/टॅब्लेट पीसीच्या कॅटेगिरीत ठेवले जाते.
आकड्यांचा खेळ
67.7 टक्क्यांवर पोहोचली मल्टी सिम सुविधांयुक्त मोबाइलची एकूण आयात .
40.4 टक्के विक्रीसह सॅमसंग स्मार्टफोन कॅटेगिरीत पहिल्या क्रमांकावर.
34.3 टक्क्यांनी वाढ झाली थ्रीजी सुविधांयुक्त हँडसेट्सच्या आयातीत. (जानेवारी-मार्च 2012)
23 टक्के हिस्सेदारीसह नोकियाने एकूण मोबाइल विक्रीत पहिला क्रमांक कायम ठेवला.
14.1 टक्क्यांसह सॅमसंग सेल्स युनिट शिपमेंट आकडेवारीत दुस-या क्रमांकावर आहे.
5.8 हिस्सेदारीसह मायक्रोमॅक्स तिस-या स्थानी