आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजाराची दिशा आणि दशा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या जगात तीन विषय सर्वश्रेष्ठ आहेत. जन्म, मृत्यू आणि जीवन. या तिन्ही विषयांवर भरपूर साहित्य लिहिले गेले आहे. मात्र, जीवन जगताना येणारे अनुभव दुसरे कोणीही आपल्याला देऊ शकत नाही. त्यासाठी स्वत:च अनुभव घ्यावा लागतो. आपल्याला जीवनाची नवी दृष्टी देणारा, अगदी चालण्यापासून प्रत्येक गोष्ट शिकवणारा आपला ‘पिता’ असतो. त्यांच्या आयुष्यात आपला सूर्योदय होतो आणि जीवनात ज्याची सर्वाधिक कमी जाणवते तोही आपला ‘पिता’च असतो. दहा वर्षांपूर्वी आपल्यासोबत स्टीव्ह जॉब्ज, बॉब होप आणि जॉनी कॅश होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, आज ‘नो जॉन, नो होप्स आणि नो कॅश’ आहे. अशा वेळी आपल्या जन्मदात्या पित्याची आठवण येते आणि त्यामुळेच की काय, ज्या वेळी पॉवर, पॉप्युलॅरिटी, पब्लिसिटी आणि पोस्टरमन हे चार ‘पी’ एकत्र येतात त्या वेळी त्या नशेतून ‘पतन’ सुरू होते आणि पाचवा ‘पी’ म्हणजेच पतन, पतन आणि पतन (डाऊनवर्ड जर्नी सुरू होतो).
2012 च्या पिचवर असून गुंतवणूक विश्व स्थिरस्थावर झालेले नाही. कदाचित पुढे सहा-सात महिने शक्यता वाटत नाही. इंडियन क्रिकेट टीमप्रमाणे 2012 सुद्धा अनप्रेडिक्टेबलच वाटते आहे. 2011 चे कॅरी फॉरवर्ड म्हणजे 2012 चा ओपनिंग बॅलन्स, असे अकाउंटिंगच्या भाषेत म्हणावे लागेल. नवीन वर्षात आंतरराष्टÑीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. या वर्षात कमोडिटीच्या किमती गुंतवणूक विश्वाची दिशा निश्चित करतील. कारण आजही आपल्या शेअर बाजारात एकूण मार्केट कॅपमध्ये 30 टक्के कमोडिटी कंपन्यांच्या शेअर्सचा हिस्सा आहे. त्यामुळे या वर्षात सिमेंट, स्टील, क्रूड ऑइल, कॉपर आणि अ‍ॅल्युमिनियम यांच्याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण गेल्या दहा वर्षांत कॉपरचे भाव पाचपट वाढले आहेत. क्रुड ऑइल आंतरराष्ट्रीय बाजारात दहा वर्षांपूर्वी 20 डॉलर प्रति बॅरल होते. ते आज 105 रुपये बॅरल झाले आहे. स्टीलचे भाव चारपट वाढले आहेत. 2001 मध्ये डॉट कॉमचा फुगा फुटला आणि त्या वेळी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत संपत्ती संरक्षण आणि निर्माण यासाठी कमोडिटीमध्ये गुंतवणूक वाढवायला सुरुवात केली. जागतिक बाजारपेठेचा जीडीपी बघितला तर 2011 मध्ये जागतिक जीडीपीमध्ये कमोडिटी 0.03 टक्क्यांवरून आज 0.65 टक्के झाला आहे. 10 बिलियन डॉलर्सची कमोडिटी आज 400 बिलियन डॉलर्स आहे. भारतीय शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे तिसºया तिमाहीचे परिणाम निराशाजनकच येतील. युरो झोन आणि अमेरिकन अर्थव्यवस्था तसेच डॉलरच्या किमती बाजाराला खाली आणतील. आपल्या देशात या पहिल्या तीन महिन्यांत 5 राज्यांच्या निवडणुका, तर उत्तरार्धात गुजरातसह इतर राज्यांचे निकाल शेअर बाजारावर परिणाम करतील. कर वाढतच आहे. त्यामुळे महागाई, व्याजदर यांची गती पुनश्च कमी-जास्त होऊ शकते. 2011 मध्ये म्युच्युअल फंडांनी 16 हजार कोटी गमावले आहेत. भविष्यात डॉलर 60 रुपये झाल्यास किंवा वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल 130 डॉलरपेक्षा जास्त झाले आणि सेन्सेक्स 14 हजारांखाली, निफ्टी 4 हजारांखाली गेल्यास नवल वाटायला नको. 2012 मध्ये देशाची गरज असल्यास गुंतवणुकीतून नफा असल्यास आणि नुकसान जास्त नसल्यास आत्ताच बाहेर पडावे.
सध्या बाजारात निश्चित व्याज देणाºया चांगल्या बॅँकांच्या, कंपन्यांच्या मुदत ठेवी अथवा डिबेंचर्स सल्लागाराच्या सल्ल्याने घ्यायला हरकत नाही. 3 ते 4 वर्षे गुंतवणूक काढावयाची नसल्यास म्युच्युअल फंडाच्या टॅक्स सेव्हिंग्जा अति उत्तम (निवड मात्र चांगली हवी), फंडाच्या मासिक उत्पन्न योजना अथवा इन्कम फंड आजच्या वातावरणातही चांगल्या आहेत. सरकारी कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीला, लाभांशासाठी, संपत्ती निर्माणकार्यासाठी उत्तम आहेत. फक्त पाच वर्षे सांभाळण्याची तयारी हवी. सोने, चांदी, रिअल इस्टेट गुंतवणूक या वर्षात टाळावी असे वाटते. शेअर बाजाराचा योग्य आणि चांगला फायदा घ्यावयाचा असल्यास म्युच्युअल फंडातील चांगल्या योजनांमध्ये 5 ते 10 वर्षांची एसआयपी असावी. गॅरंटेड नफा होईल. फक्त सल्लागाराला भेटून योजना कोणती घ्यावी याचा निर्णय घ्यावा. परस्पर गुंतवणुकीचा निर्णय घेतल्यास नशीब अपना अपना.
पास आकर भी फांसले क्यूं हैं
राज क्या है समझ में आया ।
उसको भी याद है कोई अब तक
यहाँ मैं भी तुमको भुला नहीं पाया ।।
iudit@sify.com