आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स, निफ्टी झाले तेजीवर स्वार शेअर बाजार आढावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जागतिक शेअर बाजारांतील सकारात्मक स्थिती, नकारात्मक घडामोडींकडे कानाडोळा करीत भांडवल बाजारात सातत्याने येत असलेला निधीचा ओघ यामुळे सौदापूर्तीच्या सप्ताहात सेन्सेक्स तेजीच्या लाटेवर स्वार झाला. बाजारातील खरेदीच्या बळावर सेन्सेक्सने दणदणीत 546 अंकांची वाढ नोंदवली, तर निफ्टी 28 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला.

सप्ताहाअखेरीस सेन्सेक्स सकाळी काहीशा खालच्या पातळीवर उघडला, परंतु नंतर मात्र त्याने 20 हजार अंकांची पातळी ओलांडून 20,146.83 अंकांच्या कमाल पातळीवर गेला. दिवसअखेर सेन्सेक्सने साप्ताहिक आधारावर 546.68 अंकांची दणदणीत वाढ नोंदवून 20,122.32 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

मिड-स्मॉल कॅपमध्ये बदल
बीएसईने मिड कॅप निर्देशांकात 10 नवीन समभागांचा समावेश केला असून विद्यमान 12 समभाग काढले आहे. तसेच स्मॉल कॅप निर्देशांकातही 35 नवीन समभागांचा समावेश करण्यात आला असून विद्यमान 30 समभागांना यादीतून वगळण्यात आल्याचे मुंबई शेअर बाजाराने म्हटले आहे. या नवीन बदलाची अंमलबजावणी 13 मेपासून करण्यात येणार आहे.