आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीचा पाऊस: सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक विक्रमी पातळीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण, भांडवल बाजारात वाढत असलेला निधीचा ओघ तसेच कंपन्यांच्या प्रोत्साहनजनक आर्थिक निकालामुळे माहिती तंत्रज्ञान आणि बँकांच्या गुप्त माहिती समभागांना तुफान मागणी आली. या खरेदीच्या वातावरणात सेन्सेक्सने सलग सातव्या सत्रात 121 अंकांची उसळी तर मारलीच, पण 26,147.33 अंकांची आणखी एक नवी उंची गाठली.

राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक मधल्या सत्रात 7,809.20 अंकांच्या नव्या पातळीवर गेला. त्याने अगोदरचा आठ जुलैचा 7.808.85 अंकांचा विक्रम मोडून काढला. निफ्टी 27.90 अंकांची वाढ नोंदवून दिवसअखेर 7795.75 अंकांच्या पातळीवर बंद झाला. काही निवडक समभागांची विशेष करून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांनी लक्ष वेधल्यामुळे बाजारातील खरेदीचे वातावरण कायम होते, असे बोनान्झा पोर्टफोलिओचे उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी सांगितले.

गेल्या सात दिवसांत सेन्सेक्समध्ये 121.53 अंकांनी वाढ झाली आहे. परंतु बुधवारी सेन्सेक्सने अगोदरची 26,100.08 अंकांची (7 जुलैची) विक्रमी पातळी मोडल्याने सेन्सेक्सने 1140.35 अंकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीनेदेखील सातव्या दिवशी झेप घेतली आहे. केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांची चक्रे गतिमान केल्यामुळे विदेशी गुंतवणूकदार उत्साहाने खरेदी करीत आहेत. आयसीआयसीआय बॅँक आणि स्टेट बॅँकेच्या समभागांना मागणी आली. त्याचप्रमाणे स्टेट बॅँक ऑफ बडोदातील समभाग खरेदीबाबत विदेशी गुंतवणूकदारांवर घालण्यात आलेली बंदी उठवल्यामुळे या बॅँकेच्या समभागांनीदेखील लक्ष वेधले.

दिग्गज समभागांवर उड्या
>गुंतवणूकदारांनी आघाडीच्या समभागांची भरभरून खरेदी केली. आयटी समभागांनी आपले आकर्षण कायम राखत तेजीला बळ दिले.’’
-राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनान्झा पार्टफोलिओ.

तेजीचे मानकरी
टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, हिंदाल्को, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, एसबीआय

पुढे काय?
> कंपन्यांच्या तिमाही निकालाने बाजाराला सकारात्मक टप्प्यावर आणले आहे. आगामी काही दिवस तेजी राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली.
> आगामी सणांचा हंगाम लक्षात घेता सोने-चांदीला मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मौल्यवान धातू तेजीत राहण्याचा अंदाज सराफा व्यापार्‍यांनी वर्तवला.