आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- औद्योगिक उत्पादन आणि किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर होण्याअगोदर बाजारात झालेल्या खरेदीत आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, एल अँड टी या बड्या समभागांना मागणी आली. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांमध्ये सेन्सेक्सने पहिल्यांदाच 85 अंकांची चांगली कमाई केली.
मालवाहतूक आणि प्रवासी भाड्यात वाढ करण्यात आलेली नसली तरी रेल्वे अर्थसंकल्पात फारशा उत्साहवर्धक घोषणा नसल्याने स्मॉल कॅप, मिडकॅप समभागांना फटका बसला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 20,449.83 अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. प्रारंभीच्या सत्रात मिळालेल्या खरेदीच्या पाठिंब्यावर सेन्सेक्सने 20,516.60 अंकांची आणखी वरची पातळी गाठली. परंतु नंतर मात्र सेन्सेक्स घसरून 20,427.23 अंकांच्या पातळीवर आला. दिवसअखेर सेन्सेक्स 85.12 अंकांच्या वाढीची नोंद करीत 20,448.49 अंकांच्या पातळीवर बंद झाला. मंगळवारी सेन्सेक्समध्ये 29 अंकांची वाढ झाल होती. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 21.30 अंकांनी वाढून 6084.00 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
बाजारात झालेल्या खरेदीत रिफायनरी, भांडवली वस्तू आणि बँकांच्या समभागांना चांगली मागणी आली. परंतु धातू, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि स्थावर मालमत्ता समभागांना फटका बसला.
रेल्वेशी निगडित समभाग घसरले
रेल्वे अर्थसंकल्पात फारशा अपेक्षित घोषणा नसल्याने रेल्वेशी निगडित समभागांना फटका बसला. कर्नेक्स, कालिंदी, स्टोन इंडिया या समभागांवर नकारात्मक परिणाम झाल्याचे मत बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी व्यक्त केले.
रिलायन्सच्या किमतीत सुधारणा
देशात वायूचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून किमती वाढवण्याच्या कथित प्रकरणात रिलायन्सचे मुकेश अंबानी,पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याच्या वक्तव्याने त्यामुळे रिलायन्सच्या समभाग किमतीत दोन टक्क्यांनी घसरण झाली होती. परंतु बुधवारी त्यात 1.48 टक्क्यांनी वाढ झाली.
टॉप गेनर्स : आयसीआयसीआय बँक, गेल, ओएनजीसी.
टॉप लुझर्स : टाटा स्टील, आयटीसी, मारुती सुझुकी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.