आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Share Market News In Marathi, Mumbai, Business

सेन्सेक्सची उच्चांकी भरारी; आकड्यांना भुरळून न जाण्याचा अर्थतज्ज्ञांचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून शेअर बाजारात तेजी संचारली आहे. सेन्सेक्सने आज बुधवारी सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा उच्चांकी भरारी मारली. सकाळी व्यवहार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्सने 22,162 ही नवी उंची गाठली. मात्र, गुंतवणूकदारांनी या आकड्यांना भुरळून न जाता सावध व्यवहार करण्याचा सल्ला अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. सेन्सेक्समध्ये 40.09 अंकांनी(22,162) वाढ झाली असून निफ्टीत (6601.40) 11.65 अंकांनी सुधारणा झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण देशाला राजकीय रंग चढला आहे. त्यामुळे येणारे सरकार स्थिर असेल, अशी भावना शेअर बाजारात पसरल्याने गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. 2004 सालच्या निवडणुंकामध्येही अशाच प्रकरच्या आर्थिक घडामोडींनंतर गुंतवणुकदारांना मोठा फटका सहन करावा लागला होता. त्यामुळे अर्थतज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सावध व्यवहार करण्याचा सल्ला दिला आहे.

रुपयाकडून डॉलची धुलाई....
रुपयाने डॉलरची यथेच्छ धुलाई करत मंगळवारी आणखी एक उच्चांक गाठला होता. सहा महिन्यांतील उच्चांकी स्तर गाठणार्‍या रुपयाने मंगळवारी डॉलरच्या तुलनेत 29 पैशांची कमाई करत 60.48 या पातळीपर्यंत मजल मारली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी विक्रमी पातळीवर बंद झाला होता. मंगळवारी शेअर बाजारात मोठे चढउतार दिसून आले.