आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Share Sensex Hits Record High Of 29000 In Opening Trade

ऐतिहासिक उसळी, शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने प्रथमच गाठला 29 हजारांचा टप्पा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज (गुरुवारी) ऐतिहासिक उसळी घेतली. सेन्सेक्सने प्रथमच नवा उच्चांक गाठला आहे. बाजार उघडताच सेन्सेक्सने 29 हजारांचा टप्पा गाठला.
सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिेसून आली. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पाबद्दल गुंतवणूकदारांना आशा पल्लवित झाल्या असल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सक्स (बीएसई) बुधवारी 28,958.10 सर्वोच्च अंकावर बंद झाला होता. त्यात गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात 124.02 अंकांनी वाढ होऊन तो 29,012.88 अंकावर पोहोचला. प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 25.15 अंकांची वाढ होऊन तो 8,754.65 अंकांवर पोहोचला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर कपातीनंतर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातूनच काही बड्या कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्सने नवा उच्चांक गाठल्याचे बाजाराच्या विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला आहे.
व्याजदर कपातीबरोबरच डिसेंबरमध्ये व्यापार तूट दहा महिन्यांच्या खालच्या पातळीवर आल्यामुळे बाजाराच्या उत्साहात भर होती.

बाजारात गुंतवणुकदारांचा अपेक्षेप्रमाणे खरेदीचा मूड दिसत आहे. परिणामी बाजारात तेजीचा माहोल तयार झाला आहे. गुंतवणूकदारांना या संधीचा फायदा घ्यायला हवा, असे मत 'मानस जयस्वाल डॉटकॉम'चे मानस जयस्वाल यांनी व्यक्त केले आहेत. 8800 चे लक्ष्य गाठण्यासाठी 'निफ्टी'त गुंतवणूक करण्यात सल्ला मानस यांनी दिला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, या शेअर्समध्ये फायदाच फायदा...