Home »Business »Auto» Murcedez's One And Half Crore G 63 Amg Suv Motor Launch In Market

मर्सिडीझची दीड कोटीची ‘जी 63 एएमजी’ एसयूव्ही मोटार बाजारात

प्रतिनिधी | Feb 20, 2013, 00:00 AM IST

  • मर्सिडीझची दीड कोटीची ‘जी 63 एएमजी’ एसयूव्ही मोटार बाजारात

मुंबई - आलिशान मोटारींच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या मर्सिडीझ बेन्झ या आघाडीच्या कंपनीने 1 कोटी 47 लाख रुपये किमत असलेली महागडी पण आलिशान अशी नवी ‘जी 63 एएमजी’ एसयूव्ही बाजारात दाखल केली आहे. ‘हमर’च्या प्रेमात असलेल्या एसयूव्हीप्रेमींना आता मर्सिडीझच्या या नव्या स्टायलिश एसयूव्हीचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

मर्सिडीझ बेन्झने दोन वर्षांपूर्वी ‘जी 55 एएमजी’ एसयूव्ही बाजारात आणली होती. परंतु आता तिच्या बदल्यात ही दणकट एसयूव्ही सादर केली आहे. ही एसयूव्ही सर्वप्रथम गेल्या वर्षात बीजिंगमध्ये झालेल्या ऑटो शोमध्ये सादर केली होती.

आकर्षक इंटेरिअर, डिझाइन आणि स्टायलिंगमध्ये करण्यात आलेले दूरदर्शी बदल, वाढवण्यात आलेल्या सुरक्षात्मक सुविधा, अत्याधुनिक इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि शक्तिशाली 5.5 लिटर सुपरचार्ज्ड एएमजी इंजिन ही या नव्या एसयूव्हीची काही खास वैशिष्ट्ये सांगता येतील. ब्रुस विलिस आणि जॉन मॅकक्लेन अभिनय करीत असलेल्या ए गुड डे टू डाय हार्ड या येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या नव्या चित्रपटात जी 63 एएमजी एसयूव्ही बघायला मिळणार आहे. मॉस्को शहरभर फिरलेल्या जी-क्लाससह मर्सिडीझ बेन्झच्या इतर मोटारी या चित्रपटातील हीरो मोटारी असून जॉन आणि जॅक मॅकक्लेनच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या आहेत.हा चित्रपट पाच भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आला आहे.

आणखी काही वैशिष्ट्ये
*मेटालिक पेंट, क्रोम ट्विन लूवर्ससह एएमजी रेडिएटर ग्रिल
*व्ही 8 बीटर्बोच्या लोगोसह येणारे एएमजीचे चाकाचे कव्हर
*एएमजीच्या एक्झॉस्ट सिस्टिममध्ये ट्विन क्रोम्ड साइट टेलपाइप्स
*टिटॅनियम करड्या रंगात एएमजी 5-ट्विन स्पोक लाइट अलॉय व्हील्स
* आकर्षक डिझाइनची चामड्याची आसने, डॅशबोर्ड आणि डोअर सेंटर पॅनल्स
किंमत
1,45,77,000 रुपये (एक्स शोरूम, मुंबई)

Next Article

Recommended