आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णप्रेमींसाठी ‘माय ज्वेल बॉक्स’ मोबाइल अ‍ॅप!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोने ग्राहकांना त्यांच्याकडील सर्व सुवर्ण मालमत्ता केवळ बोटाने कळ दाबल्यासरशी वस्तुत: एका ठिकाणी जतन करून ठेवता येईल आणि मनात येईल तेव्हा तिचे एकूण मूल्य जाणून घेता येईल असा ‘माय ज्वेल बॉक्स’ हा एक आगळावेगळा मोबाइल अ‍ॅप मुथ्थूट फिनकॉर्पने बाजारात आणला आहे. अ‍ॅँड्रॉइड प्रणालीवर आधारित हा भारतातील पहिलावहिला असा अ‍ॅप आहे.

सोने ग्राहकांमध्ये जास्त महिला ग्राहकांची संख्या असल्याने आपल्याकडील मौल्यवान सुवर्ण संचयाचा ‘व्हर्च्युअल’ अर्थात ‘आभासी’ का होईना पण तो सुवर्णसंचय बघण्यासाठी या अ‍ॅपची अनोखी संकल्पना मुथ्थूटने आणली आहे.
या व्हर्च्युअल मंचवर आपल्या सर्व सुवर्ण आभूषणांचा संचय करण्यास मदतकारक असा हा अभिनव प्रकार आहे. शिवाय अगदी काही सेकंदात सोन्यातील मालमत्तेचे ताजे मूल्य ग्राहकांना अचूकपणे जाणून घेण्याची सोयही यात आहे. या संकल्पनेला मिळालेला प्रारंभिक प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक असून, लवकरच अशा प्रकारची सेवा आयओएस मंचावर दाखल करण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे मुथ्थूट पापाचन समूहाचे संचालक थॉमस जॉर्ज मुथ्थूट यांनी सांगितले.

माय ज्वेल बॉक्समध्ये संचय केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे एकूण वजन आणि खरेदीच्या वेळी त्यासाठी पडलेली प्रति ग्रॅम किंमत यांच्या आधारे या मालमत्तेचे ताजे मूल्य चुटकीसरशी जाणून घेता येईल.


डाटा सुरक्षित
या अ‍ॅपमध्ये सोन्याचा विद्यमान प्रति ग्रॅम दर नियमितपणे अद्ययावत असतो. ज्याच्या आधारे ते ग्राहकांना त्यांच्या एकूण मालमत्तेचे मूल्य सांगून त्याच्या आधारे सोने-तारण कर्ज किती मिळू शकेल, याचीही माहिती पुरवते. हा डेटा केवळ ग्राहकाच्या हँडसेट्सवर जतन होत असल्याने तो पूर्णपणे सुरक्षितही ठरतो. ग्राहकांना त्यांच्या दागिन्यांच्या फोटो घेऊन त्यांचे बांगड्या, कंठहार, अंगठी वगैरे प्रकारात वर्गीकरण करण्याचीही हे अ‍ॅप संधी देते.

असे करा डाऊनलोड
कोणाही ग्राहकांना ‘गुगल प्ले’वर जाऊन ‘माय ज्वेल बॉक्स’ हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल अथवा 0484 4074668 वर मिस्ड कॉल देऊन डाऊनलोड लिंक आपल्या मोबाइल फोनवर मिळवता येईल.