आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mutual Fund Grabing 13 Thousand , Fund Company Selling Equity

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्युच्युअल फंडांकडून 13 हजार कोटींचा उपसा, म्युच्युअल फंड कंपन्यांकडून समभागांची विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भांडवल बाजारात सध्या स्थानिक म्युच्युअल फंडांनी विक्रीचे धोरण कायम ठेवले आहे. त्यातूनही दलाल स्ट्रीटवर सध्या सातत्याने अनिश्चिततेचे वातावरण असल्याने म्युच्युअल फंडांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जवळपास 13 हजार कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे.


बाजार नियंत्रक सेबीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंडांनी जून महिन्यामध्ये समभाग बाजारपेठेत जवळपास 269 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. विशेष म्हणजे सलग बारा महिने म्युच्युअल फंडांकडून निधी बाजाराच्या बाहेर जात आहे.


मे महिन्यात म्युच्युअल फंडांनी सर्वाधिक 3 हजार 508 कोटी रुपयांचा निधी काढून घेतल्यामुळे पहिल्या सहामाहीत एकूण 12 हजार कोटी रुपयांचा निधी बाजाराबाहेर गेला आहे. म्युच्युअल फंडांनी जून महिन्यात कर्ज योजनांमध्ये सर्वाधिक 64,602 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मागील वर्षाच्या जूनमध्ये या गुंतवणूकदारांनी कर्जाशी निगडित योजनांमध्ये 78,761 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.समभाग बाजारातील मंदीच्या वातावरणामुळे स्थानिक म्युच्युअल फंडांनी जास्त व्याजदराचा लाभ मिळवण्यासाठी कर्ज बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे पहिल्या सहामाहीत म्युच्युअल फंडांनी कर्ज बाजारपेठेत 2.92 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कर्ज बाजारपेठेत जोखमीचे कमी असलेले प्रमाण हेदेखील एक कारण यामागे आहे.


रोखे बाजाराकडे कल
अलीकडच्या काही आठवड्यांत भांडवल बाजारात दोलायमान स्थिती असतानाही विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मात्र याच सहामाहीत 72 हजार कोटी रुपयांचा निधी बाजारात आणला आहे. जून महिन्यात मात्र त्यांनी 11 हजार कोटी रुपयांचा निधी भांडवल बाजाराबाहेर नेला आहे.