आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडाद्वारे करा असेट अलोकेशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही गुंतवणूक साधनाच्या पोर्टफोलिओमध्ये दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. एक वैविधीकरण (डायव्हर्सिफिकेशन) आणि दुसरे असेट अलोकेशन. डायव्हर्सिफिकेशनमुळे विविध कंपन्यांत किंवा वेगवेगळ्या मुदतीच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्यास मदत होते. असेट अलोकेशन म्हणजे विविध असेट गटांत गुंतवणूक करणे. या दोन्हींचा समावेश असणारे म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीच्या दृष्टीने एक चांगले माध्यम आहे.

सध्या म्युच्युअल फंड सर्वच असेट क्लासमध्ये गुंतवणूक करतात. जसे की, इक्विटी, डेब्ट, गोल्ड आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांत गुंतवणूक केली जाते. असेट अलोकेशनसाठी सहायक ठरणार्‍या काही प्रकारांविषयी....
1. इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स : सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंडांना इक्विटी म्युच्युअल फंडाचेच रूप मानले जाते, तर शेअर्सना जोखमीच्या गटात गणले जाते. मात्र, वाढकेंद्रित पोर्टफोलिओमध्ये इक्विटी असणे अत्यंत आवश्यक आहे. जोखमीनुसार लार्ज खॅप, मिड कॅप, सेक्टोरल फंडात गुंतवणूक करून पोर्टफोलिओ बनवता येतो.

2. डेब्ट ओरिएंटेड फंड्स : यालाच फिक्स्ड इन्कम इन्व्हेस्टमेंट असेही म्हणतात. बँकेतील मुदत ठेवी (एफडी), पोस्टातील ठेवी, करमुक्त इन्फ्रा बाँड्स ही गुंतवणूक साधने या गटात येतात. निश्चित उत्पन्नाठी गुंतवणुकीचे हे उत्तम साधन आहे. यात कमी कर आणि चांगला परतावा मिळतो.

3. गोल्ड सेव्हिंग फंड्स किंवा गोल्ड ईटीएफ : सोन्यातील गुंतवणुकीसाठी गोल्ड ईटीएफ उत्तम साधन आहे. याद्वारे सोन्याच्या किमतीनुसार गुंतवणूक करता येते. यात दागिन्यांप्रमाणे घडणावळ तसेच कस्टोडियन चार्ज लागत नाही. मात्र, सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.

4. रिअल इस्टेट व्हेंचर कॅपिटल फंड्स : थेट रिअल इस्टेमध्ये गुंतवणूक करणारा म्युच्युअल फंड नाही. मात्र, सेबीच्या अनुमतीने काही म्युच्युअल फंड रिअल इस्टेट गुंतवणूकदारांसाठी व्हेंचर कॅपिटल स्कीम्स सादर करताहेत. हाय नेटवर्थ गुंतवणूकदारांसाठी या योजना आहेत. कारण यात किमान गुंतवणुकीची रक्कम मोठी असते.

5.असेट अलोकेशन फंड्स : कोणत्या गटात किती गुंतवणूक करावी याबाबत संभ्रम असणार्‍या गुंतवणूकदारांसाठी हे साधन आहे. हे फंड्स परंपरागत, मध्यम किंवा आक्रमक स्वरूपाचे असून रिस्क प्रोफाइलनुसार ते वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये गुंतवणूक करतात. काही असे फंड आहेत जे मार्केट रिस्कनुसार अलोकेशन करतात.

इक्विटी आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात अस्थिर आणि जोखमीची असते. दुसरीकडे, डेब्ट आणि सोने ही सुरक्षित साधने मानली जातात. त्यामुळे रिस्क प्रोफाइल आणि उद्दिष्टानुसार गुंतवणुकीचे नियोजन करावे. यामुळे योग्य वेळी निर्धारित लक्ष्य गाठणे सुलभ होईल.

लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.