आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिक्स मॅच्युरिटी योजना यंदा पडल्या फिक्या, सरत्या वर्षात फंडांतील निधीचा ओघ आटला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - म्युच्युअल फंडांच्या निश्चित परिपक्वता कालावधी योजनांमध्ये (फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन) मोठ्या प्रमाणावर निधी येऊन गेल्यानंतर आता मात्र या योजना फिक्या पडल्या आहेत. आर्थिक अनिश्चिततेचे वातावरण आणि येणार्‍या महिन्यांमध्ये अधिक चांगल्या परताव्याची गुंतवणूकदारांना असलेली अपेक्षा यामुळे या फंडांमधील निधीचा ओघ कमी झाला असल्याचे बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
शेअर बाजारासह अन्य बाजार घटकांमध्ये तुलनेने स्थिर वातावरण असल्याने फिक्स मॅच्युरिटी योजनांमध्ये पुढच्या तिमाहीपर्यंत तरी अशीच मरगळ कायम राहण्याची शक्यता काही निधी व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडालाही गुंतवणूकदारांमध्ये अशा प्रकारच्या योजनांमध्ये पुरसे स्वारस्य निर्माण करता आले नाही. त्यामुळे या कंपनीने आपली अशा स्वरूपाची एक योजना बाजारातून काढून घ्यावी लागली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलला आपल्या एफएमपी मालिकेतील ‘71-368 दिवस योजना एक’ या योजनेतील रक्कम गुंतवणूकदारांना परत करावी लागली.