आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंड कंपन्यांनी धरावी बँकांची कास : सेबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विमा कंपन्यांनी आपल्या विविध विमा योजना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांचा अतिशय प्रभावी वापर आतापर्यंत केला आहे. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड उत्पादनांच्या वितरणातही या बँका महत्त्वाची भूमिका पार पडू शकतात, असा विश्वास भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’ने व्यक्त केला आहे.

पारंपरिक बँकिंग उत्पादनांशिवाय राष्ट्रीयीकृत बँका थर्ड पार्टी विमा उत्पादनांच्या वितरणामध्ये अतिशय यशस्वी झाल्या आहेत. त्याच यशाचे प्रतिबिंब म्युच्युअल फंड उत्पादनांच्या बाबतीतही बघायला मिळू शकेल, असे मत सेबीने व्यक्त केले आहे.
म्युच्युअल फंड उत्पादनांचा विस्तार तसेच वितरण जाळे अधिक भक्कम करण्यासाठी भांडवल बाजार नियंत्रकांनी म्युच्युअल फंडांच्या सर्व उत्पादनांचे वितरण करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशा सूचना सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना केल्या आहेत.