आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांची नजर समभाग फंडांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बाजारात आलेल्या निवडणूकपूर्व तेजीमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनी नव्या विक्रमी पातळ्यांची नोंद केली आहे. समभागांमध्ये आलेली ही तेजी अशीच कायम राहिली तर कर्ज योजनांमधील गुंतवणूकदार समभाग योजनांकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्ज योजनांमधील निधीचा मोठा ओघ समभाग योजनांकडे येण्याचा अंदाज म्युच्युअल फंड व्यवसायातील निधी व्यवस्थापकांनी व्यक्त केला आहे.

एप्रिल ते मे महिन्यात लोकसभा निवडणुका झाल्यानंतरही बाजारातील तेजी अशीच कायम राहिली तर गुंतवणूकदार समभाग योजनांकडे वळण्याची शक्यता आहे. कारण गेल्या पाच वर्षांमध्ये समभाग योजनांनी खराब कामगिरी केली आहे. पण या तेजीमुळे समभाग मत्ता वर्गावरील त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अलीकडच्या काळात कर्ज निधी योजनांकडून समभाग निधीकडे गुंतवणूकदार वळले असले तरी त्याला कल म्हणता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. काही तज्ज्ञांनी मात्र गुंतवणूकदार अशा प्रकारे वळले तरी त्याचा फार मोठा परिणाम जाणवणार नाही, असाही सूर व्यक्त केला आहे.

समभाग निधी गटात फेब्रुवारीमध्ये सलग चौथ्या महिन्यात निधीचा ओघ आला असून त्यात 582 कोटी रुपयांची अतिरिक्त भर पडली आहे. समभाग निधींच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 3.3 टक्क्यांनी वाढून ती फेब्रुवारी महिन्यात 1.81 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता 9.16 लाख कोटी रुपयांवर गेली असून त्यामध्ये समभाग गटातील व्यवस्थापनाखालील मालमत्ता 1.81 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

तज्ज्ञांचे मत काय
शेअर बाजारातील तेजी कायम राहिल्यास गुंतवणूकदार नजीकच्या काळात कर्ज योजनांकडून समभाग गटातील फंडांकडे वळू शकतात. ही तेजी त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी असेल. - देबाशिष मलिक, सीईओ, आयडीबीआय म्युच्युअल फंड

गुंतवणूकदार थोडेफार वळून रोखासंग्रहामध्ये फेरबदल होईल, परंतु तो लक्षणीय नसेल. - द्विजेंद्र श्रीवास्तव, सुंदरम म्युच्युअल फंड

निधीत झाली मोठी वाढ
समभाग निधी गटात फेब्रुवारीमध्ये सलग चौथ्या महिन्यात निधीचा ओघ आला असून त्यात 582 कोटी रुपयांची अतिरिक्त भर पडली आहे. समभाग निधींच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 3.3 टक्क्यांनी वाढली आहे.