आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडांसाठीचे नियम आणखी कडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बाजार नियंत्रक व नियामक सेबीने म्युच्युअल फंडांसाठी नवे डिस्क्लोझर (सादरीकरण) नियम जारी केले. ज्या मालमत्तेचे फंडाकडून व्यवस्थापन केले जाते त्याबाबत दर महिन्याला स्पष्टीकरण देण्याचे फंडांना सुचवण्यात आले आहे. तसेच म्युच्युअल फंड कंपन्यांच्या कोणत्याही प्रस्तावावर आपल्या मताचा अधिकार वापरतात त्याचाही खुलासा फंडांना करावा लागणार आहे. नवे नियम एक एप्रिलपासून लागू होणार आहेत.

किरकोळ आणि छोट्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे सुलभ साधन असावे, या हेतूने म्युच्युअल फंडांसाठी प्रथमच दीर्घकालीन धोरण बनवण्यात आले आहे. या धोरणामुळे वितरण व्यवस्थेलाही नवी चालना मिळणार आहे.

सेबीचे नवे नियम
ज्या मालमत्तेचे फंडाकडून व्यवस्थापन केले जाते त्याबाबत दर महिन्याला स्पष्टीकरण देणे अनिवार्य
म्युच्युअल फंड कोणत्याही प्रस्तावावर मताधिकाराचा वापर करतात तो कशाच्या आधारे करतात हे सांगावे लागणार