आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडांतून 74 हजार कोटींचा उपसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मागील वर्षातल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये म्युच्युअल फंडांमध्ये आलेला निधीचा ओघ आता थंडावला आहे. डिसेंबर महिन्यात विविध म्युच्युअल फंड योजनांमधून 74 हजार कोटी रुपयांचा निधी गुंतवणूकदारांनी काढून घेतला आहे.

ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीतील 1.15 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात म्युच्युअल फंड उद्योगात 74,578 कोटी रुपयांचा निधी आला असल्याचे बाजार नियंत्रक ‘सेबी’ची आकडेवारी सांगते. मागील वर्षात म्युच्युअल फंडांनी निव्वळ 32,368 कोटी रुपयांचा निधी गोळा केला होता; परंतु मागील वर्षाच्या मार्च महिन्यात याच गुंतवणूकदारांनी 1.08 लाख कोटी रुपयांचा विक्रमी निधी म्युच्युअल फंडातून काढून घेतला होता. म्युच्युअल फंड कंपन्या आपल्या गुंतवणूकदार सदस्यांकडून रक्कम घेऊन ती समभाग, रोखे, चलन बाजारातील साधने किंवा तत्सम रोख्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. म्युच्युअल फंडांनी मागील वर्षातल्या 1,20,269 कोटी रुपयांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत (एप्रिल ते डिसेंबर) 76,098 कोटी रुपयांचा निधी संकलित केला आहे.

फंडांची मालमत्ता घटली :
0 ढोबळ पातळीवर विचार करता म्युच्युअल फंडांनी डिसेंबर महिन्यात 8.85 लाख कोटी रुपयांचा महसूल गोळा केला, तर त्याच वेळी 9.59 लाख कोटी रुपयांची विक्री केली. त्यामुळे या कालावधीत म्युच्युअल फंडांमध्ये 74,578 कोटी रुपयांच्या निधीचा निव्वळ ओघ आला.

0 म्युच्युअल फंडातून निधी काढून घेतल्यामुळे म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 31 डिसेंबरअखेर 8.26 कोटी रुपये नोंद झाली. त्या अगोदरच्या महिन्यात व्यवस्थापनाखालील मालमत्ता 8.9 लाख कोटी रुपये होती.