आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांच्या फंड योजनांवर उड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- म्युच्युअल फंडांसाठी पुन्हा एकदा अच्छे दिन आले असून अब की बार गुंतवणूकदारांनी विविध म्युच्युअल फंड योजनांमध्ये एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गुंतवली आहे. ही गुंतवणूक एप्रिल महिन्यात झाली असून गेल्या तीन वर्षांतील गुंतवणुकीचा हा उच्चांक आहे.
मार्च महिन्यात म्युच्युअल फंड उद्योगातील 1.09 लाख कोटी रुपयांचा निधी काढून घेतल्यानंतरही एप्रिल महिन्यात इतक्या मोठय़ा प्रमाणावर निधी संकलन झाले आहे. येणार्‍या काही महिन्यांमध्ये निधी संकलनात आणखी वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
म्युच्युअल फंड व्यवसायाच्या वाढीसाठी कर लाभांबरोबरच अन्य विविध उपाययोजना बाजार नियंत्रक सेबीने अलीकडेच दीर्घकालीन धोरण जाहीर केले असून त्याचा लाभ क्षेत्राला मिळण्यास सुरुवात झाली आहे. घरगुती बचतीचा ओघ समभाग आणि म्युच्युअल फंड योजनांमध्ये यावा, असाही या धोरणाचा हेतू आहे.

ढोबळ पातळीवर म्युच्युअल फंडांनी 8.33 लाख कोटी रुपयांचे निधी संकलन एप्रिल महिन्यात केले असून उलट 7.20 लाख कोटी रुपयांच्या योजनांची विक्री याच कालावधित झाली. परिणामी फंडांमध्ये एकूण 1,12,433 कोटी रुपयांचा ओघ आला आहे. फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता याच कालावधित वाढून ती 9.45 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

तीन वर्षांचा उच्चांक
बाजार नियंत्रक सेबीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंड उद्योगात एकूण 1,12,433 कोटी रुपयांचा ओघ आला. हा तीन वर्षांतील उच्चंक आहे. एप्रिल 2011 नंतर एखाद्या महिन्यात पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. एप्रिल 2011 मध्ये गुंतवणूकदारांनी 1.84 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.