आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंड : सर्वात मोठा ‘एफडीआय’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जपानच्या निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनीने रिलायन्स कॅपिटल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीमधील 26 टक्के भांडवल तब्बल 1 हजार 450 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात इतक्या मोठ्या प्रमाणावर ‘एफडीआय’ येणारी ही सर्वात मोठी खरेदी आहे.
या अगोदर 2009 मध्ये जागतिक पातळीवरील गुंतवणूक कंपनी टी रो प्राइस आणि युटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट यांच्यामध्ये 142.4 दशलक्ष डॉलरचा झालेला खरेदी व्यवहार सर्वात मोठा मानण्यात येत होता. टी रो प्राइसने युटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि युटीआय ट्रस्टी कंपनी या दोन कंपन्यांमधील 26 टक्के भांडवली हिस्सा 142.4 दशलक्ष डॉलरला खरेदी करण्याची घोषणा केली होती; परंतु निप्पॉन लाइफ इन्शुरन्सने आता सर्वात जास्त एफडीआय आणून टी रो प्राइसचा विक्रम मोडला आहे.

अ‍ॅसेट मॅनेजमेंट क्षेत्रातील आतापर्यंतचे लक्षवेधी व्यवहार
2003 : भारतीय औद्योगिक विकास बॅँकेने आयडीबीआय - प्रिन्सिपल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीमधील आपले संपूर्ण भागभांडवलाची संयुक्त सहकार्यातील भागीदार प्रिन्सिपल फायनान्शियल ग्रूपला 94 कोटी
रुपयांना विक्री.
2004 : स्टेट बॅँक आॅफ इंडियाने आपल्या म्युच्युअल फंड व्यवसायातील एसबीआय फंड मॅनेजमेंटमधील 37 टक्के भांडवली हिश्शाची फ्रान्समधील सोसायटी जनरल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीला 35 दशलक्ष
रुपयांना विक्री
2005 : चेन्नईतील सुंदरम फायनान्सची उपकंपनी सुंदरम अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आणि फ्रान्समधील बीएनपी परिबास अ‍ॅसेट मॅनेजमेंट यांच्यामध्ये भारतात म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी 50: 50 टक्के प्रमाणात संयुक्त सहकार्य करार.
2007 : नेदरलॅँडमधील रोबेको ग्रूप एनव्हीने कॅनरा इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेस लि.मधील 49 टक्के भागभांडवल खरेदीची घोषणा.
2009 : एलआयसी म्युच्युअल फंडाने आपल्या 35 टक्के भांडवली हिश्शाची नोमुरा या जपानमधील अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीला 62.8 दशलक्ष डॉलरला विक्री.
2010 : फ्रान्समधील नॅटीक्सीसकडून आयडीएफसी एमएफमधील 25 टक्के भांडवली हिश्शाची 61.1 दशलक्ष
डॉलरला खरेदी.