आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्युच्युअल फंड योजनांना पुन्हा एकदा धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एप्रिल-मे या दोन महिन्यांमध्ये भरभरून 1.44 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर म्युच्युअल फंड योजनांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. गुंतवणूकदारांनी जून महिन्यात विविध म्युच्युअल फंड योजनांमधून 48 हजार कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे.


भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यामध्ये म्युच्युअल फंड योजनांमध्ये 37,435 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती. परंतु याच गुंतवणूकदारांनी जून महिन्यात मात्र 48,403 कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे.


दोन वर्षांचा उच्चांक नोंदवत एप्रिल महिन्यात विविध म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूकदारांनी जवळपास 1.06 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.


एप्रिल 2011 पासूनचीदेखील ही सर्वात जास्त गुंतवणूक मानली जाते. कारण त्या वेळी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड योजनांमध्ये 1.84 लाख रुपयांचा निधी आणला होता.


6.9 कोटीचा निधी संकलित
ढोबळ पातळीवर म्युच्युअल फंड कंपन्यांनी 6.9 लाख कोटी रुपयांचा निधी संकलित केला, तर 7.46 लाख कोटी रुपयांच्या म्युच्युअल फंड योजनांची विक्री झाली. परिणामी या योजनांमध्ये 48,403 कोटी रुपयांचा निव्वळ निधी आला. म्युच्युअल फंड योजनांमधून बाहेर पडल्याने म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तादेखील कमी होऊन ती अगोदरच्या महिन्यातल्या 8.68 लाख कोटी रुपयांवरून 8.11 लाख कोटी रुपयांवर आली. विद्यमान आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांनी 95,606 रुपयांचा निव्वळ निधी संकलित केला. अगोदरच्या आर्थिक वर्षात याच कालावधीत 95,519 कोटी रुपयांचा निधी संकलित झाला होता.