आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युचुअल फंडांचा लाभांश करमुक्त, मात्र...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकेत मुदत ठेवीत पैसे ठेवले तर त्यावर व्याज मिळते, परंतु त्या व्याजावर आयकर द्यावा लागतो. एका ब्रँचमधील ठेवीतून वार्षिक 10,000 रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर टीडीएस कापला जातो. टीडीएस कापला किंवा नाही कापला तरी मुदत ठेवीवर जितके व्याज मिळते ते करपात्र असते. आपल्या उत्पन्नात हे व्याज समाविष्ट करावे लागते. त्यामुळे समजा आपल्याला 30 टक्के कर द्यावा लागत असेल तर आपल्या व्याजावरही 30 टक्के कर लागू होतो. याउलट म्युचुअल फंडांचा जो लाभांश आपल्या हातात मिळतो तो करमुक्त असतो. मात्र, तो आपल्याला देण्यापूर्वी म्युचुअल फंडांना डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स सरकारला द्यावा लागतो.


म्हणजे हा कर वजा करून मगच लाभांशाची रक्कम आपल्या हातात येते. या डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्सच्या नियमांमध्ये 1 जून 2013 पासून मोठा बदल झालेला आहे, तो लक्षात घेणे आवश्यक आहे. आता म्युचुअल फंडातील गुंतवणुकीबाबत व त्यातून मिळणा-या डिव्हिडंड म्हणजे लाभांशाबाबत कराचे नियम असे आहेत : (फक्त निवासी व्यक्ती व संयुक्त हिंदू कुटुंब यांचीच इथे माहिती दिलेली आहे. कॉर्पोरेट्स व एनआरआय यांचा इथे विचार केलेला नाही.)
डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स
म्युचुअल फंडाचा प्रकार कर
इक्विटी म्युचुअल फंड काहीच नाही
इक्विटी म्युचुअल फंडांशिवाय इतर सर्व फंड. 25 टक्के + 10 टक्के सरचार्ज + 3 टक्के सेस म्हणजे
यात मनी मार्केट फंड, लिक्विड फंड, शॉर्ट टर्म डेट फंड, एकूण 28.325 टक्के
फ्लोटिंग रेट फंड, एमआयपी इत्यादी सर्व प्रकारच्या डेट
फंडांचा समावेश आहे.
तसेच निवासी व्यक्ती व संयुक्त हिंदू कुटुंब यांच्याकरिता कॅपिटल गेन्सचे नियम असे आहेत :

लाँगटर्म कॅपिटल गेन्स टॅक्स (गुंतवणुकीचा कालावधी 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ असेल तर)
इक्विटी म्युचुअल फंड काहीच नाही
इक्विटी म्युचुअल फंडांशिवाय इतर सर्व फंड. 10 टक्के इंडेक्सेशनविना
20 टक्के इंडेक्सेशनसह,
यापैकी जे कमी असेल ते आणि
+ 3 टक्के सेस
इंडेक्सेशनविना 10.300 टक्के
इंडेक्सेशनसह 20.600 टक्के

शॉर्टटर्म कॅपिटल गेन्स टॅक्स (गुंतवणुकीचा कालावधी 12 महिने किंवा त्यापेक्षा कमी असेल तर)

इक्विटी म्युचुअल फंड 15 टक्के + 3 टक्के सेस
एकूण 15.450 टक्के
इक्विटी म्युचुअल फंडांशिवाय इतर सर्व फंड 30 टक्के + 3 टक्के सेस
एकूण 30.900 टक्के
(टीप 1: गुंतवणूकदार हायेस्ट टॅक्स ब्रॅकेटमध्ये
आहे असे गृहीत धरून.
टीप 2: गुंतवणूकदाराचे उत्पन्न 1 कोटी रुपयांपेक्षा
जास्त असेल तर 10 टक्के सरचार्ज लागेल.)
वरील तक्त्यावरून लक्षात येईल की, डेट म्युचुअल फंडावरील डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स वाढलेला आहे.
या वाढलेल्या टॅक्समुळे आपल्या हातात कमी रक्कम येईल. तसेच बँकांतील मुदत ठेवींबरोबर तुलना केली तर मुदत ठेवींवर निश्चित दराने व्याज मिळते, तर डेट फंडातून किती लाभ मिळणार त्याची हमी नसते. बँक मुदत ठेवीवर कॅपिटल अ‍ॅप्रिसिएशन नसते, तर डेट फंडातील आपल्या गुंतवणुकीचे मूल्य कमी-जास्त होऊ शकते व ते जास्त झाले तर आपल्याला लाभ मिळतो व कमी झाले तर तोटा होतो.
एकूणच नव्या तरतुदीमुळे लाभांशाचा पर्याय घेण्याऐवजी ग्रोथ पर्याय स्वीकारणे जास्त चांगले. निश्चित दराने व्याज हवे असेल तर बँकांतील मुदत ठेवींबरोबर एचडीएफसी लिमिटेडच्या मुदत ठेव योजनांत रक्कम गुंतवणे हाही चांगला पर्याय आहे.