आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडाच्या एजंटशी कसा व्यवहार करायचा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च महिना आला की, एजंट प्रलोभने दाखवतात. मात्र, त्याला बळी पडू नका. इतके टक्के परतावा मिळेल, असे तो सांगत असला तरी प्रत्यक्ष तितका मिळतोच असे नाही. पैसे गुंतवताना फंडाचा पूर्वेतिहास तपासावा.
तुमच्याकडे सेलफोन असेल आणि तुम्हाला एखाद्या म्युच्युअल फंडाच्या प्रतिनिधीचा कॉल आला नाही असे उदाहरण विरळच. आपण नेमके एखाद्या महत्त्वाच्या कामात असताना हे कॉल येतात आणि आपण वैतागतो. बहुतेकांना आपण देत असलेल्या योजनेच्या माहितीची पूर्ण कल्पना नसते. त्यांची सर्व्हिस क्वालिटी चांगली नसते, पण तुम्ही नेमके प्रश्न विचारले तर फायदा होतो. अशा फोन करणाºया एजंटशी कसा व्यवहार करायचा ते आता पाहू.
एआरएन कार्ड - म्युच्युअल फंडाच्या सर्व प्रतिनिधींना एक परीक्षा द्यावी लागते. ती पास झाल्यावर एक एआरएन कार्ड दिले जाते. एएमएफआय (आम्फी) हा नोंदणी क्रमांक देते. त्यामुळे तुम्हाला कोणाचाही फोन आला तर प्रथम त्याचा आम्फी क्रमांक विचारा. तो असल्याखेरीज कोणीही फोन करू शकत नाही. कोणी तुमच्या घरी आला तर त्याला हे कार्ड दाखवायला सांगा.
विक्री आणि खरेदी - एखादी योजना का सुरू केली जाते आहे हे विचारा. या योजनेत किती काळ रक्कम गुंतून पडेल याची माहिती विचारा. एखादा एजंट तुम्हाला इक्विटी योजना असून वर्षभर गुंतवा, असे सांगत असेल तर अशा योजनापासून दूर राहा. किमान तीन वर्षे गुंतवा, असे सांगत असेल तर ती चांगली सुरुवात असेल. त्याला मूलभूत प्रश्न विचारून तो किती अनुभवी आहे हे तपासा. विशिष्ट फंडविषयी आग्रह
धरल्यास ते मान्य करू नका. अनेक फंड तो सांगत असल्यास असे का, हे विचारा. योजनेतून बाहेर पडता येते का याची खात्री करा.
प्रशासन हा प्रश्न- योजना विकली म्हणजे आपले काम संपले एवढ्यापुरता एजंटचा रोल नाही. तुमची गुंतवणूक आहे तोवर एजंटने तुम्हाला सेवा देणे आवश्यक आहे. तुमच्या मेलवर योजनेची माहिती येते का हे तपसा. तुम्ही प्रथमच गुंतवणूक करत असाल तर केवायसी (नो युअर कस्टमर) निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. ते पूर्ण केले नसतील तर एजंटने ते काम करणे आवश्यक आहे. जे एजंट ही जबाबदारी घेणार नाहीत त्यांना टाळा. तुमच्या राहत्या घराचा पत्ता बदलला तर केवायसीमध्ये तसा बदल करावा लागेल. 2009 मध्ये फंड कंपनीला एन्ट्री लोड म्हणून रक्कम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे एजंट किती सेवा शुल्क घेणार हे आधी विचारा. सेबीने गेल्या वर्षीपासून जुन्या गुंतवणूकदारासाठी 100 रुपये, तर नव्यासाठी 150 रुपये शुल्क घेण्यास संमती दिली आहे.
नियोजन करा- अनेक एजंट मार्च महिना आला की प्रलोभने दाखवतात. मात्र, त्याला बळी पडू नका. इतके टक्के परतावा मिळेल असे तो सांगत असला तरी प्रत्यक्ष तितका मिळतोच असे नाही. त्यामुळे ईएलएसएस म्हणजे ज्या योजना शेअर बाजाराशी लिंक आहेत तेथे पैसे गुंतवताना फंडाचा पूर्वेतिहास तपासावा.