आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे वर्ष म्युच्युअल फंड उद्योगासाठी लाभदायी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ता पुढील वर्ष म्युच्युअल फंड उद्योगासाठी चांगले ठरण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
आयडीबीआय म्युच्युअल फंडांचे मुख्य कार्यकारी अधिकारी देबाशिष मलिक यांच्या म्हणण्यानुसार अमेरिका, युरोप आणि जपान या देशांत सुधारणा होत असल्याचे संकेत सातत्याने मिळत आहेत. त्यामुळे उगवत्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या त्या देशातील कंपन्यांना यामुळे लाभ होणार असून ते पर्यायाने भारतीय बाजारपेठेसाठीही फलदायी ठरेल. नवीन वर्षात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने कर्ज निधी योजनांमध्ये गुंतवणुकीचा ओघ येण्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
निवडणुका निर्णायक
लोकसभा निवडणुकानंतर केंद्रात स्थिर सरकार येण्याच्या विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे देशातील वृद्धीला चालना मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे यामुळे जास्तीत जास्त गुंतवणूकदार समभाग म्युच्युअल फंड योजनांमध्ये आकर्षित होण्याची शक्यता मलिक यांनी व्यक्त केली. म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता 30 नोव्हेंबरअखेर वाढून ती 7.01 लाख कोटी रुपयांवरून (31 मार्च) 8.9 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत म्युच्युअल फंडांनी जवळपास 20 लाख गुंतवणूकदार गमावले आहेत.