आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडांची ‘डेट’ क्षेत्राला पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील म्युच्युअल फंडांनी यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात कर्ज बाजारपेठेत 41 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. परिणामी या फंडांनी सरत्या वर्षात आतापर्यंत एकूण 4.33 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
जुलै महिना वगळता म्युच्युअल फंडांनी या संपूर्ण वर्षामध्ये कर्ज योजनांमध्ये गुंतवणूक केली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होणारे लक्षणीय अवमूल्यन नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेने केलेल्या विविध उपाययोजनांचा मात्र कर्जरोखे बाजारपेठेवर परिणाम झाला. त्यामुळे जुलैनंतर कर्ज बाजारपेठेतून म्युच्युअल फंडांनी 23,740.40 कोटी रुपयांचा निधी काढून घेतला. परंतु दुसºया बाजूला
विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून मात्र गेल्या महिन्यापासून कर्ज बाजारपेठेत जवळपास सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यंदाच्या वर्षात कर्ज बाजारपेठेतून विदेशी गुंतवणूकदार
संस्थांनी 56 हजार कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे.
बाजार नियंत्रक सेबीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार स्थानिक म्युच्युअल फंडांनर नोव्हेंबर महिन्यात कर्ज बाजारपेठेत खरेदी केल्याचे दिसून आले आहे. या गुंतवणूकदारांनी जवळपास 41,623 कोटी रुपयांच्या कर्ज योजनांची खरेदी केली. कर्ज बाजारपेठेत आलेल्या तेजीचा फायदा उचलताना म्युच्युअल फंडांनी या वर्षाच्या अकरा महिन्यांमध्ये 4.33 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. परंतु याच कालावधीत या गुंतवणूकदारांनी समभाग योजनांमधून 13 हजार कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे.
चांगल्या परताव्याने लक्ष
बँकांमधील मुदत ठेवींच्या तुलनेत कर्जाशी निगडित योजनांमधून चांगला परतावा मिळत असल्याने म्युच्युअल फंडांनी या विभागावरच लक्ष केंद्रित केले. समभाग निधीच्या तुलनेत कर्ज योजनांमध्ये जोखमीचे प्रमाण कमी असल्यानेदेखील गुंतवणूकदार याकडे जास्त आकर्षित झाले असल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.