आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mutual Funds Infuse Rs 23530 Cr In Equities This Year

म्युच्युअल फंडांची समभागांत २३ हजार कोटींची गुंतवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भांडवल बाजारात आलेल्या तेजीवर स्वार होताना सरत्या वर्षात म्युच्युअल फंडांनी स्थानिक समभागांमध्ये २३,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. त्या अगोदरच्या वर्षात जवळपास २१ हजार कोटी रुपयांचा निधी बाजारातून काढून घेण्यात आला होता.

विविध म्युच्युअल फंडांनी नवीन वर्षातही समभाग बाजारपेठेत गुंतवणुकीचा ओघ असाच कायम राहण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. जेपी मॉर्गन एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार सुर्ती यांनी देखील नवीन वर्ष म्युच्युअल फंड उद्योगासाठी चांगले ठरण्याचा आशावाद व्यक्त केला.

भांडवल बाजार नियंत्रक सेबीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंड कंपन्यांनी २३,५३० कोटी रुपयांची गुंतवणूक समभागांमध्ये केली आहे. केंद्रातील सरकार बदलल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांच्या मानसिकतेत बदल झाला असून या गुंतवणूकदारांचा सहभाग वाढत आहे. बाजारातही तेजी असल्याने समभागांमधील गुंतवणुकीचा ओघ कायम राहणार असल्याचे मत उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.