आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mutual Funds Loses More Than 34 Lac Account Holders

फंडांकडे फिरवली खातेदारांनी पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- म्युच्युअल फंड उद्योगाने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांमध्ये वैयक्तिक खाती किंवा रोखासंग्रह स्वरूपात जवळपास 34 लाख गुंतवणूकदारांपेक्षा जास्त गुंतवणूकदार गमावले असल्याचे सेबीच्या अहवालात दिसून आले आहे.

अगोदरच्या म्हणजे 2011 - 12 वर्षात म्युच्युअल फंड उद्योगात 4.64 कोटी गुंतवणूकदार होते; परंतु ही संख्या फेब्रुवारीअखेर संपलेल्या कालावधीत 4.30 कोटींवर आली आहे. याचा अर्थ 34.34 लाख नवीन गुंतवणूकदारांची खाती कमी झाली असल्याचे सेबीने एकूण गुंतवणूकदार खात्यांच्या आधारावर तयार केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.
म्युच्युअल फंडांच्या समभाग योजनेतील गुंतवणूकदार संग्रहांची संख्या 42.5 लाखने घटली आहे; परंतु कर्ज निधी विभागातील नवीन गुंतवणूकदारांच्या खात्यांची संख्या 8 लाखांपेक्षा जास्त वाढली आहे. समभाग निधीमधील गुंतवणूकदार खाती कमी होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या 3.76 कोटींवरून फेब्रुवारीअखेर 3.34 कोटींवर आली आहे. म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण नवीन गुंतवणूकदार खात्यांमध्ये समभाग रोखासंग्रहाचे प्रमाण 70 टक्के आहे.

कारण काय ?
गेल्या आर्थिक वर्षात सेन्सेक्सने जवळपास 8 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीची नोंद केली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारातील तेजीचा फायदा घेताना नफारूपी कमाई करून म्युच्युअल फंड योजनांतून बाहेर पडण्याची संधी घेतली. क्वांटम अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी जिमी पटेल यांच्या मते. बाजारात झालेली नफारूपी
कमाई आणि म्युच्युअल फंड उद्योगातील विविध योजनांचे विलीनीकरण या दोन गोष्टींमुळे गुंतवणूकदारांची खाती लक्षणीय कमी झाली.

कर्ज बाजाराकडे वाढता ओघ
कर्ज बाजारपेठेत मात्र तेजीचे वातावरण आहे. म्युच्युअल फंडांच्या कर्ज बाजारपेठेत याच कालावधीत 4.05 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. विशेष म्हणजे कर्ज निधी योजनांतील गुंतवणूकदारांच्या खात्यातदेखील वाढ होऊन ती 8.56 लाख वरून 61.05 लाखांवर गेली आहे.

समभाग योजनांना फटका
गेल्या काही महिन्यांपासून समभाग विभागातील खाती सातत्याने बंद होत आहेत. गेल्या आठ महिन्यात यातून मोठा निधी काढून घेण्यात आला आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत 21 हजार कोटी रुपयांच्या समभागांची विक्री झाली आहे.