आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mutul Fund Company's Offer Scheme For Tax Saving Person

कर बचत करणा-यांना म्युच्युअल फंड कंपन्यांचे विविध योजना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्ष सरत आले आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड कंपन्यांनी कर बचत करणा-या विविध योजना आणण्याचा धडाका लावला आहे. राजीव गांधी इक्विटी योजनेला फंडांनी महत्त्व दिले आहे. याच योजनेला लक्षात घेऊन अनेक फंडांनी विविध नव्या योजना सादर केल्या आहेत, तर काही फंड कंपन्यांनी त्यांच्या सध्याच्या योजना राजीव गांधी योजनेत समाविष्ट करण्याचा फंडा चालवला आहे.

राजीव गांधी इक्विटी योजनेचा लाभ आपल्या सध्या सुरू असलेल्या अनेक फंड योजनातून घेता येईल असे कोटक , क्वाँटम, गोल्डमॅन सॅक्श, मोतीलाल ओसवाल आणि रेलिगेयर या फंड हाऊसनी आपल्या वितरकांना कळवले आहे. राजीव गांधी इक्विटी योजनेअंतर्गत शेअर बाजारात प्रथमच गुंतवणूक करणा-या व वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा कमी असणा-या गुंतवणूकदाराला 50,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर कर बचत सवलत मिळणार आहे.

कोठे कराल गुंतवणूक
राजीव गांधी इक्विटी स्कीमअंतर्गत येणा-या शेअर्स आणि उत्पादनांची श्रेणी सरकारने निश्चित केलेली आहे. यात बीएसई -100 व सीएनएक्स-100 निर्देशांकात सूचिबद्ध असलेल्या कंपन्या आणि महारत्न,नवरत्न व मिनीरत्न कंपन्यांचा समावेश आहे. तसेच एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) व म्युच्युअल फंडांचा या स्कीममध्ये समावेश आहे.