आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माय बिझनेस... दांपत्यांचे अनोखे माय व्हॅलेंटाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरुण नातू, कल्पना नातू (नाशिक) - Divya Marathi
अरुण नातू, कल्पना नातू (नाशिक)

मुंबई - व्हॅलेंटाइन डे... ग्रीटिंग, भेटवस्तू, गुलाबाचे फूल देऊन सहजीवनाचा प्रारंभ करण्याचा दिवस. पण येथे तारखेला नाही तर भावनेला महत्त्व जास्त असते. अनेकदा अहंकार, कुरघोडी, डावलले जाण्याच्या भावनेतून या प्रेमाला तडा जाऊन हे प्रेमबंध तुटतात. हेच प्रतिबिंब कौटुंबिक व्यवसायातही दिसते. अशी अनेक व्यावसायिक दांपत्ये आहेत, ज्यांनी अहंकार, मतभेदांचा तिळमात्र स्पर्श होऊ न देता एकमेकांवरील असीम प्रेम, विश्वास आणि मतांचा आदर या त्रिसूत्रीवर आपल्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर कसे नेले हे त्यांच्याच शब्दांत..

शंतनू रास्ते, स्मिता रास्ते (ठाणे)
इंग्लंड व इतर देशांत निर्यात, भारतातल्या नामांकित कंपन्यांना पुरवठा
शंतनू रास्ते मेकॅनिकल इंजिनिअर तर स्मिता रास्ते आयुर्वेदिक डॉक्टर. लग्नानंतर तीन वर्षे उभयता नोकरी करीत होते. परंतु भविष्यातली आयुर्वेद उत्पादनांची वाढती बाजारपेठ आणि पत्नीचा या क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन हाच व्यवसाय करण्याचा निर्णय 24 वर्षांपूर्वी घेतल्याचे रास्ते सांगतात. व्यवसाय करताना एकमेकांच्या कामात हस्तक्षेप न करण्याचे पथ्य आणि अडचणींचे शेअरिंग यामुळेच व्यवसायाचा मार्ग सुकर झाला, असे स्मिता रास्ते यांनी सांगितले. शंतनू म्हणतात, पत्नीला वा पतीला मदत करणे हा टिपिकल विचार आहे. परिस्थिती बघून प्रॅक्टिकली विचार करणे महत्त्वाचे असते.
व्हॅलेंटाइन संदेश : परस्परांच्या मतांचा आदर करा. व्यवसायावर प्रेम करा. तो जमेलच ही खूणगाठ बांधा.

अशाच दोन जोडप्यांविषयी वाचा पुढे ..............................