आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओगेम मिनिक्राफ्टचे गूढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेकब ग्रेनबॅरी आणि विल ब्लू डिसेंबर 2011 पासून एका विशाल निर्मिती प्रकल्पाशी संबंधित आहेत. त्याचा आकार अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरापेक्षा मोठा आहे. तो सध्या 70 टक्के पूर्ण झाला आहे आणि त्यात 8000 रचना तयार झाल्या आहेत. जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या ए साँग ऑफ आइस आणि फायर बुक्स कादंबरी तसेच एचबीओच्या सिरीज गेम ऑफ थ्रोन्समध्ये वर्णन केलेल्या वेस्टिरॉस बेटाचा हा डिजिटल अवतार आहे. पुस्तके आणि मालिकांमध्ये वर्णन केलेले महाल, स्तंभ, फार्महाऊस, दुकाने आणि जहाजे स्वीडिश कंपनी मोझांगचे ऑनलाइन गेम मिनेक्राफ्टमध्ये बनवले जात आहे. खरोखरचे वेस्टिरॉस भव्यतेच्या दृष्टीने हे आसाधारण असू शकते, मात्र ही तर मिनेक्राफ्टची ओळख आहे. आतापर्यंत 500 पेक्षा जास्त लोकांनी याच्या निर्मितीत भाग घेतला आहे.


जर तुम्ही एखाद्या गेमच्या साम्राज्यात तलवार घेऊन हैदोस घालू शकता, तर ते तुम्हाला मिनेक्राफ्टमध्ये सापडेल. मात्र, मिनेक्राफ्टला विनाश नाही, तर निर्माणकार्य अनोखे बनवते. त्यात कित्येक खेळाडू अशा जगाची कल्पना करतात जे कुठेच अस्तित्वात नाही. हे सर्व काही एक घटफूट ठोकळ्यापासून बनवले जाते. मिनेक्राफ्ट हिंसा आणि वेगाने चालणा-या व्हिडिओगेमपेक्षा वेगळे आहे. संयुक्त राष्ट्रे मिनेक्राफ्टला जीवन सुखद बनवणा-या एका माध्यमाच्या रूपात बघते. सप्टेंबर 2012 मध्ये यूएन हॅबिटॅट संस्थेने मोझांगसोबत ब्लॉक-बाय-ब्लॉक कार्यक्रम सुरू केला.
मोझांगमागे एखादा अपूर्व सिद्धांत व मोठ्या व्यवसाय उभा करण्याची कल्पना केली नव्हती. मात्र, मिनेक्राफ्टमध्ये दोन्ही गोष्टी आहेत. मोझांगने 2012 मध्ये 24 कोटी डॉलर कमावले. यातील सुमारे पूर्ण वाटा मिनेक्राफ्टच्या विक्रीतून आला आहे. याचा पीसी व्हर्जन 26.95 डॉलरमध्ये विकला जातो. एसबॉक्स 360, आयफोन, आयपॅड व अँड्रॉइडवर इतर आवृत्त्या उपलब्ध आहेत. आतापर्यंत अडीच कोटी कॉपींची विक्री झाली आहे.


बाहेरचे गुंतवणूकदारांचे मोठे भांडवल किंवा कोणत्याही मार्केटिंग प्लानशिवाय मिळालेले हे यश आहे. स्वीडिश भाषेत मोझांग शब्दाचा उपयोग गॅझेटसाठी केला जातो. त्याचे मुख्यालय स्टॉकहोम येथे सोडेरमाल्म जिल्ह्यात अशा ठिकाणी आहे जिथे रेस्टॉरंट, दुकाने आणि लहान कंपन्यांची कार्यालये आहेत.


मिनेक्राफ्ट गेम डेव्हलप करणा-या मार्कस पर्सनचा हा खासगी प्रकल्प होता. ते खासगी साइटवर सांगतात, तुम्ही मला नॉच म्हणू शकता. 33 वर्षीय नॉच मान्य करतात की, 2006 मध्ये रिलीझ झालेल्या प्रसिद्ध फँटसी गेम ड्वार्फ फोर्ट्रेसपासून त्यांना मिनेक्राफ्टची प्रेरणा मिळाली. 2009 मध्ये आलेल्या इन्फिनिमायनरलाही मिनेक्राफ्टला पूर्वज म्हटले जाऊ शकते. निर्मात्याने हा गेम अपूर्ण सोडून दिला होता. पर्सन यांनी नंतर आपल्यासोबत जेन्स बर्गेस्टनला घेतले. मिनेक्राफ्ट गेमच्या दोन पद्धती आहेत. गेमच्या सर्व्हायव्हल मोडमध्ये आपण टूल्स निर्माण करत नाही, तोपर्यंत लोखंडी, दगडी ब्लॉकपासून बनवलेल्या ठोकळ्यांपासून बिल्डिंग सुरू करू शकत नाहीत. राक्षसांपासून बचाव करून निर्माण करणे कठीण असते. क्रिएटिव्ह मोडमध्ये खेळाडूला धोका नसतो. तो उडू शकतो. त्याच्याकडे अमर्याद निर्मिती सामग्री असते.