आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N Narayana Murthy Returns To Infosys As Executive Chairman

इन्‍फोसिसचे Damage Control, नारायण मुर्ती परतले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची आघाडीची आयटी कंपनी इन्‍फोसिसमध्‍ये एन. नारायण मुर्ती यांचे पुनरागमन झाले असून त्‍यांची आजपासून कंपनीचे कार्यकारी अध्‍यक्ष म्‍हणून नियुक्ती करण्‍यात आली आहे. मुर्ती यांनी कंपनीचे अध्‍यक्ष म्‍हणून 2011 मध्‍ये राजीनामा देऊन मानद अध्‍यक्षपद स्विकारले होते. परंतु, आता त्‍यांना संचालक मंडळाने कार्यकारी अध्‍यक्ष आणि अतिरिक्त संचालक म्‍हणून पुढील पाच वर्षांसाठी नियुक्त केले आहे. या कालावधीत ते केवळ 1 रुपये वार्षिक वेतन घेणार आहेत. एस. गोपालकृष्‍णन हे पुन्‍हा कंपनीचे कार्यकारी उपाध्‍यक्ष म्‍हणून पदभार स्विकारणार आहेत. तर एस. डी. शिबुलाल हे व्‍यवस्‍थापकीय संचालक आणि सीईओ पदावर कायम राहणार आहेत.

कंपनीने दिलेल्‍या माहितीनुसार, विद्यमान अध्‍यक्ष के. व्‍ही. कामत हे पायउतार होतील आणि स्‍वतंत्र संचालक म्‍हणून कार्यभार स्विकारतील. यासंदर्भात कामत यांनी सांगितले की, कंपनीची वाढ, आयटी क्षे्त्रातील नवी आव्‍हाने तसेच गुंतवणूकदारांच्‍या हितासाठी हा निर्णय घेण्‍यात आला आहे. अनेक गुंतवणूकदारांनी कंपनीचे संचालक मंडळ बळकट करण्‍याची मागणी केली होती आणि मुर्ती यांच्‍यापेक्षा योग्‍य व्‍यक्‍ती दुसरी कोणी असूच शकत नाही.

नारायण मुर्ती यांनी यासंदर्भात सांगितले की, हा बदल अनपेक्षित होता. परंतु, इन्‍फोसिस हे माझेच अपत्‍य आहे. त्‍यामुळे मी इतर योजना बाजूला सारून हा बदल स्विकारला आहे.

कशामुळे नारायण मुर्ती परतले? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये....