आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी व्हिजनवर उद्योग जगत खूश; देशाला प्रगतीची नवी दिशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बुधवारी सरकारचा आगामी काळातील दृष्टिकोन आपल्या भाषणातून सांगितला. तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी उत्पादनात वाढ, महागाईला लगाम आणि युवकांच्या कौशल्याला वाव देणारे काम अशी त्रिसूत्री मोदी यांनी सांगितली. उद्योग जगताने मोदी यांच्या या व्हिजनचे स्वागत केले आहे. या धोरणामुळे देशाला प्रगतीची नवी दिशा मिळेल, अशी आशा उद्योग जगताने व्यक्त केली.

सर्वांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब
भारतीय समाजमनाचे प्रतिबिंब असणारे व्यापक धोरण मोदी यांनी सांगितले. भारतीय लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल, असे हे धोरण आहे. उद्योग संघटनांनी सुचवलेल्या काही सूचनांचे प्रतिबिंबही मोदी यांच्या भाषणात दिसले. उच्च तंत्राचा वापर करून कृषी उत्पादन वाढवण्यावर मोदी यांचा भर राहणार आहे. यामुळे शेतकरी, कृषी विद्यापीठे आणि ग्राहक यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल.
- सिद्धार्थ बिर्ला, अध्यक्ष, फिक्की

स्वप्नपूर्तीच्या आशा वाढल्या
सर्वांना घरे देण्याचा मोदी सरकारचा संकल्प स्तुत्य आहे. प्रत्येक घरात वीज, ब्रॉडब्रँड कनेक्टिव्हिटी, आरोग्य सुविधा आणि शिक्षण या सुविधा देण्याचे धोरण स्वागतार्ह आहे. मोदी यांनी त्यांच्या भाषणात कौशल्यपूर्ण भारताचा उल्लेख केला, हे अत्यंत उचित आहे. देशातील कामगार, कर्मचारी, अधिकारी या सर्वांच्या कौशल्याबाबत विचार झाला हे अत्यंत स्वागतार्ह आहे. तंत्रज्ञानाच्या वापरातून विकास हे मोदी यांनी मांडलेले सूत्र प्रगतीकडे नेणारे आहे.
- अजय श्रीराम, अध्यक्ष, सीआयआय