आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Divya Marathi, Make In India

संशोधनातून साकारणार मेक इन इंडिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात "मेक इन इंडिया'चे स्वप्न दाखवले आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी संशोधन आणि विकासाला (आर अँड डी) चालना देणे भाग पडणार आहे. त्यामुळेच मेक इन इंडियाचा मार्ग संशोधन व विकासाच्या माध्यमातून जाणार आहे. आर्थिक वर्ष २००९-१० साठी देशाच्या आर अँड डीसाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ०.८८ टक्के निधीची तरतूद केली होती. हे प्रमाण दीड ते दोन टक्के वाढवल्याशिवाय अर्थव्यवस्था िवकासाच्या मार्गावर आणणे कठीण आहे. जागतिक बँकेच्या मते, २०११ मध्ये देशातील आर अँड डीवरील खर्च घटून जीडीपीच्या ०.८१ टक्क्यांवर आला आहे.

७२,६२० कोटी रुपये संशोधनावर खर्चाची तरतूद करण्यात आली होती २०११-१२ मध्ये
०६% पेक्षा कमी िहस्सा आहे खासगी कंपन्यांचा संशोधनावरील खर्चात
३०% िहस्सा आहे सार्वजनिक कंपन्यांचा संशोधनावरील एकूण खर्चात

पेटंटमध्येही मागे
वर्ष २०१०-११ दरम्यान देशातील पेटंटसाठी एकूण ३९,४०० अर्ज आले; मात्र त्यातील केवळ ८,३१२ अर्ज भारतीयांकडून करण्यात आले होते. यातील ७,५०९ अर्ज स्वीकारण्यात आले आणि ६२३६ भारतीयांना पेटंट िमळाले.

मोदींनी काय सांिगतले?
कंपन्यांनी आपले उत्पादन कोठेही िवक्री करावे; मात्र त्याचे उत्पादन, निर्मिती भारतातच करावी. त्यामुळे देशातील तरुणांना रोजगार िमळेल. सध्या िवदेशातील कंपन्या स्वस्तात संशोधन करून आपले उत्पादन चढ्या दरात देशात िवकत आहेत.

७५ % संशोधन िवदेशात
भारतात होणाऱ्या मूळ संशोधनात ७५ टक्क्यांहून जास्त संशोधन िवदेशातील कंपन्या िकंवा संस्था करतात. ज्याचा फायदा देशातील उद्योगांना होत नाही.

१० लाखांत १६४ संशोधक
वर्ष २०१० मधील आकडेवारीनुसार सरासरी १० लाख लोकसंख्येमागे केवळ १६४ संशोधक आहेत. िशक्षण व्यवस्था आणि सामाजिक आर्थिक रचनेत कोठेच संशोधनाला चालना िमळत नसल्याचे यावरून स्पष्ट होते.