आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Chemicals And Fertilizers Investing One Thousand Crores In Odisha

राष्‍ट्रीय रासा‍यनिक आणि खत कंपनी ओडिशात गुं‍तवणार एक हजार कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ओडिशामधील तालचेर येथे युरिया आणि अमोनियम नायट्रेट खत प्रकल्प उभारण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील राष्‍ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या कंपनीने एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.


तालचेर येथे सहा हजार कोटी रुपये खर्च करून भव्य खत प्रकल्प उभारण्यात येत असून त्यामध्ये कोल इंडिया, गेल आणि फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपन्यांचा समावेश आहे. तालचेर येथील संयुक्त सहकार्यातील या प्रकल्पात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर.जी. राजन यांनी सांगितले.


या प्रकल्पामध्ये अमोनिया (2700 मेट्रिक टन प्रतिदिन), युरिया (3,850 मेट्रिक टन प्रतिदिन), नायट्रिक अ‍ॅसिड (850 मेट्रिक टन प्रतिदिन), अमोनियम नायट्रेट (1,00 मेट्रिक टन प्रतिदिन) या प्रकल्पांचा समावेश आहे. हा कोळशावर आधारित रासायनिक खत प्रकल्प असल्याचे राजन यांनी स्पष्ट केले.


तालचेर प्रकल्पासाठी लागणारा कोळसा हा कोल इंडिया लिमिटेडच्या महानंदी कोलफील्ड या उपकंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जमीन आणि अन्य सुविधा फर्टिलायझर्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


दरम्यान, थळ येथील युरिया संयंत्राची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रतिदिन 2200 मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचे संयंत्र तसेच प्रतिदिन 3,850 मेट्रिक टन क्षमतेचे संयंत्र उभारण्याचादेखील आरसीएफचा मानस आहे. यासाठी 4,200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.


मुख्य संयंत्रासाठी ठेकेदाराची निवड करण्याची प्रकिया पूर्ण झाली असून आवश्यक ती मंजुरी मिळणे बाकी असल्याचे राजन यांनी सांगितले.


खते महागणार
यंदा चांगला झालेला पाऊस लाभदायक ठरणार असला तरी रुपयाच्या अवमूल्यनामुळे चालू तिमाहीत विदेशी चलन तोटा सहन करावा लागण्याची भीती राजन यांनी व्यक्त केली.तसेच आगामी काळात खतांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.