आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे- देशातील सहकारी बँका आणि पतसंस्था यांची शिखर संस्था असणार्या राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अॅण्ड क्रेडिट सोसायटीज लिमिटेडच्या (नॅफकॅब) अध्यक्षपदी कॉसमॉस बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर यांची एकमताने निवड करण्यात आली. नवी दिल्ली येथे झालेल्या नॅफकॅबच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत देशभरातील सहकारी बँका आणि पतसंस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी झालेल्या मतदानात डॉ. अभ्यंकर यांना सर्वाधिक 391 पैकी 267 मते मिळाली. ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन यांना 245, तर इचलकरंजी कलाप्पाण्णा आवाडे सहकारी बँकेचे अध्यक्ष अशोक सौदंतीकर यांनी 205 मते मिळाली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या निवडीनंतर अध्यक्षपदी डॉ. अभ्यंकर यांची, तर उपाध्यक्षपदी विद्याधर अनास्कर यांची निवड करण्यात आली. देशातील सोळाशे नागरी संस्था, दोन हजारांहून अधिक पतसंस्था यांची शिखर संस्था म्हणून नॅफकॅब काम पाहते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.