आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National Spot Exchange Limited E Service Closed Down

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एनएसईएलमधील ‘ई’ वायदे व्यवहार बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमधल्या ‘ई’ मालिकेतील वायदे व्यवहारांवर बंदी येण्याची शक्यता आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालय याबाबत लवकरच अध्यादेश जारी करण्याची शक्यता गृहीत धरून नॅशनल स्पॉट एक्स्चेंजने (एनएसईएल) अगोदरच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ‘ई’ मालिकेतील उत्पादनांचे वायदे व्यवहार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.


वायदे बाजारातील व्यवहार नियमांचे उल्लंघन केल्यामुळे यापुढे कोणतेही नवीन व्यवहार एक्स्चेंजमध्ये करू नयेत, असे स्पष्ट आदेश केंद्र सरकारने दिल्यानंतर ‘एनएसईएल’ने 31 जुलैला आपल्या व्यवहार मंचावरील सर्व एक दिवसाचे वायदे व्यवहार स्थगित केले. त्यानंतर देशातील हा सर्वात मोठा वायदे बाजार मोठ्या अडचणीत सापडला आहे. वायदे व्यवहार बंद केल्यानंतर जवळपास 5 हजार 600 कोटी रुपयांच्या व्यवहारांची पूर्तता कशी करावी, असा यक्षप्रश्न या एक्स्चेंजला पडला आहे.


अन्य सर्व वायदे व्यवहारांना स्थगिती दिली असली तरी ‘ई’ मालिकेतील सोने, चांदी, तांबे, झिंक, जस्त, निकेल आणि प्लॅटिनम या कमॉडिटीजचे इलेक्ट्रॉनिक व्यवहार मात्र आतापर्यंत चालू होते. परंतु ग्राहक व्यवहार मंत्रालय या व्यवहारांवरदेखील बंदी आणण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


दरम्यान, ‘एनएसईएल’च्या संकेतस्थळावर मात्र केंद्र सरकारकडून कोणताही आदेश अद्याप मिळालेला नाही. परंतु प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘ई’ मालिकेतील कोणतेही व्यवहार यानंतर करण्यात येणार नाहीत, असे म्हटले होते.


हित जपणार
एनएसईएलच्या सौदै व्यवहार स्थगितीची केंद्र सरकारने गंभीरपणे दखल घेऊन वस्तू बाजार नियंत्रक ‘वायदे बाजार आयोगा’ला चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर एनएसईएल वस्तू बाजारातील काही सौद्यांना स्थागिती देण्यात आलेली असली तरी केंद्र सरकार गुंतवणुकदारांचे हित जपण्यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करेल तसेच सौद्यांना स्थागिती देण्यामागे काय उद्देश आहे याबाबतची माहिती एनएसईएलकडून येणार असल्याचे वायदा बाजार आयोगाचे अध्यक्ष रमेश अभिषेक यांनी त्यानंतर स्पष्ट केले.