आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Spot Exchange Limited Illegal Work Cheks By CBI P. Chidambaram

नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमधील आता सीबीआयकडे - पी. चिदंबरम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमधील (एनएसईएल) कथित गैरव्यवहारांमध्ये गुन्हा अन्वेषण विभाग लक्ष घालत असून कंपनीविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली.
भारतीय दंडविधान तसेच अन्य काही कायद्यांचा भंग केल्याची तक्रार गुन्हा अन्वेषण खात्याकडे आली असून त्या तक्रारींमध्ये लक्ष घालण्यात येत आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कोणती कारवाई करायची याचा निर्णय गुन्हा अन्वेषण खाते घेईल, असे चिदंबरम यांनी सांगितले.

आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव अरविंद मायाराम यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशीनुसार एनएसईएलमधील आर्थिक पेचप्रसंग प्रकरणामध्ये गुन्हा अन्वेषण खाते, वायदा बाजार आयोग आणि कंपनी व्यवहार मंत्रालय लक्ष घालत आहे. यातील प्रत्येकाला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी एनएसईएलमधील अनियमितांची यादी तयार केली असून प्रत्येक जण लवकरात लवकर कारवाई करेल, अशी ग्वाही चिदंबरम यांनी दिली.