आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National Spot Exchange Limited In Trouble, Solution Finding

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड संकटात, उपायांची शोधाशोध सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) सध्या संकटात आहे. या एक्स्चेंजद्वारे झालेल्या सौद्यांचा निपटारा करण्यासाठी उपायांची शोधाशोध सुरू आहे. एनएसईएलद्वारे धातू, साखर, तांदूळच नव्हे तर कच्च्या सुताची खरेदी-विक्री चालते.

येथे टी प्लस दोन आणि टी प्लस पंचवीस या प्रकारचे सौदे चालतात. टी प्लस दोन प्रकारच्या सौद्यात खरेदीदार दोन दिवसांनी विक्रेत्याला पैसे देऊ शकतो. तर टी प्लस पंचवीस या प्रकारच्या व्यवहारात खरेदीदाराला विक्रेत्याचे पैसे देण्यासाठी 25 दिवसांची मुदत असते.

प्रथम दुर्लक्ष, ताशेरे मिळाल्यावर अद्भुत तडजोडीसाठी शिफारस : सपॅट एक्स्चेंजमध्ये वस्तू विक्री करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित गोदामात ते उत्पादन ठेवले असल्याची पावती घ्यावी लागते.

या पावतीच्या आधारेच वित्तीय संचालक त्या कृषी उत्पादनाचे टी प्लस टू असे सौदे करायचे. तसेच या पावतीवर टी प्लस पंचवीस असे व्यवहार व्हायचे. या सौद्यांवर संचालकांना सरळ 12 ते 14 टक्के कमाई व्हायची.


कायद्याचे कवच हवे
टी-25 सेटलमेंटला फॉरवर्ड कॉँट्रक्ट (वायदा) मानता येत नाही. या सौद्यांना फॉरवर्ड मार्केटिंग कमिशन (एफएमसी ) च्या वायदा व्यवहार नियंत्रण अधिनियम 1952 (एफसीआरए) च्या कक्षेत आणायला हवे असे जाणकारांना वाटते.

मालच नाही, तरीही सौदे
एक्स्चेंजच्या सदस्यांद्वारे करण्यात येणार्‍या शॉर्ट सेलिंगकडेही दुर्लक्ष झाल्याने प्रकरण विघडले. एक्स्चेंजशी संबंधित गोदामात माल नसतानाही सौदे करण्याची मुभा देण्यात आली. कागदावर दाखवण्यात आलेला माल गोदामात आहे की नाही असा संशय आहे.