आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एसएमई’च्या कर्जात विविध शुल्कांचा खोडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील सर्वच बँका लघु व मध्यम उद्योगांना (एसएमई) कर्जासाठी प्राधान्य देतात. मात्र, या बँकांकडून आकारण्यात येणा-या विविध शुल्कांमुळे हे उद्योग हैराण आहेत. यात औचित्य नसणा-या काही शुल्कांचाही समावेश आहे. विशेषकरून स्थळ तपासणी (साइट ऑब्झर्व्हेशन) व प्रक्रिया शुल्कावर या उद्योगांची नाराजी आहे. त्यामुळे अनेक लघु व मध्यम उद्योग शेअर बाजारात किंवा खासगी इक्विटीमधील नोंदणीचा सहारा घेत आहेत. अलीकडेच सुरू झालेल्या एसएमई एक्सचेंजवर दोन डझनांहून अधिक कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्याद्वारे या कंपन्यांनी पाच ते 10 कोटी रुपयांपर्यंत निधी उभा केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया एसएमईकडून भांडवलावर आधारित व गैरभांडवली एकूण कर्जाच्या 0.3 टक्के शुल्क आकारते. कमाल 30 लाखांपर्यंत हे शुल्क आकारण्यात येते. एएए तसेच एए श्रेणीच्या कंपन्यांसाठी हे शुल्क 0.15 टक्के असून कमाल कर्जमर्यादा 15 लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे ए श्रेणीतील कंपन्यांसाठी हे शुल्क 0.2 टक्के आहे आणि कमाल कर्जमर्यादा 20 लाख रुपये आहे.

बँक ऑफ इंडिया 25 लाख रुपयांपर्यतच्या कर्जावर एसएमईकडून प्रक्रिया शुल्कापोटी 9,170 रुपये घेते. याशिवाय बँक 367 रुपये डॉक्युमेंटेशन शुल्क आकारते, निरीक्षण शुल्क 615 रुपये तर मॉर्गेज शुल्कापोटी 4100 रुपये घेते, तर बँक ऑफ बडोदा प्रक्रिया शुल्कापोटी प्रतिलाख रुपयांमागे 350 रुपये आकारते. पंजाब नॅशनल बँक 225 रुपये प्रतिलाख शुल्काशिवाय अपफ्रंट शुल्कही आकारते.

विविध बँका होम लोन तसेच ऑटो लोनवरील वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क वेळोवेळी माफ करतात. त्याच प्रमाणे एसएमईईसाठी देण्यात येणा-या कर्जावर शुल्क आकारण्याचे औचित्य का ? असा सवाल लघु व मध्यम उद्योगाचा आहे.

कोणकोणते शुल्क - बँक ऑफ इंडिया 25 लाख रुपयांपर्यतच्या कर्जावर एसएमईकडून प्रक्रिया शुल्कापोटी 9,170 रुपये घेते. याशिवाय बँक डॉक्युमेंटेशन शुल्क, निरीक्षण शुल्कही आकारते.

पंजाब नॅशनल बँक 225 रुपये प्रतिलाख शुल्काशिवाय अपफ्रंट शुल्कही आकारते

नवा मार्ग - अनेक लघु व मध्यम उद्योग शेअर बाजारात किंवा खासगी एक्विटीमधील नोंदणीचा सहारा घेत आहेत.