आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Need To Revise The Flower Space Index : Ajay Makan

महानगरांसाठी चटई निर्देशांक धोरणाचा आढावा घेण्याची गरज : अजय माकन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - परवडणा-या घरांच्या उभारणीला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबईसारख्या महानगरांसाठी असलेल्या चटई निर्देशांक (एफएसआय) धोरणाचा आढावा घेण्याची गरज असून शहर विकासातील वाढत्या आव्हानांवर एक चांगला तोडगा ठरू शकतो, असे मत केंद्रीय गृहनिर्माण मंत्री अजय माकन यांनी व्यक्त केले.

मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास 50 टक्के जनता ही झोपडपट्ट्यांमध्ये राहते. दिल्लीसारख्या शहरातही 84 टक्के बेघर स्वयंरोजगार मिळवून अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची भर घालत आहेत. महानगरांमधील मोक्याच्या ठिकाणीदेखील परवडणा-या घरांची निर्मिती करणे गरजेचे असल्याकडेही माकन यांनी लक्ष वेधले. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज आणि सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च यांच्यातर्फे आयोजित परिसंवादात ते बोलत होते. एसएफआयचा आढावा घेऊन मुंबईतल्या परवडणा-या घरांच्या बांधकामाला गती देण्यासाठी त्यात योग्य ते बदल करण्याची गरज आहे.