आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- बहुराष्ट्रीय उद्योगांना लेखा विषयक बदलत्या नियमांची माहिती देऊन त्यांचे हिशोब अचूक ठेवणारे मनुष्यबळ सध्या भारतात कमी असल्याने जागतिक दर्जाच्या एसीसीए (असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाईड अकौंटन्ट) संस्थेने पुण्यातील नेस वाडिया आणि सिम्बॉयसिस कला आणि वाणिज्य या महाविद्यालयांशी करार करून द्विलक्ष्यी अभ्यासक्रम सुरु करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती एसीसीएच्या भारताच्या व्यवस्थापक इलहाम पंजांनी यांनी पत्रकारांना दिली.
भारतात ज्या ज्या ठिकाणी ब्रिटीश कौन्सिल ग्रंथालय आहे तिथे हा अभ्यासक्रम भविष्यात सुरु केला जाणार आहे. सध्या पौंड 100 रुपया झाल्याने हा अभ्यासक्रम ब्रिटन मध्ये करणे आणि त्यासाठी शिक्षण कर्ज काढणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे. तेच प्रमाण पत्र आणि बीएससी ही ऑक्सफोर्ड ब्रुक्स विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम येथे केल्यास खर्चात 500 टक्के बचत होणार आहे.
भारतात लेखापरीक्षण कामाचे परदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग करत असल्याने जागतिक वित्तीय निकष पाळणारे (आयएफआरएस) अभ्यासक्रम शिकून तयार झालेले मनुष्यबळ हवे आहे.
केपीएमजी, देलोय, अर्न्स्ट-यंग यासारख्या मोठ्या लेखापरीक्षण कंपन्यांना त्यांची गरज भासते. ती यामुळे पूर्ण होणार आहे. बीपीओ कंपन्यांना असे लोक लागतात. नेस वाडिया आणि सिम्बॉयसिस संस्थात अभ्यासक्रम केल्यास नोकरीसाठी मुलाखतीला बोलवले जाण्याची हमी मिळते.
विद्यार्थी या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अभ्यास करू शकतात त्यामुळे नोकरी करूनही तो करता येणार आहे. त्या म्हणाल्या की देशात आम्ही सात शहरात याचे केंद्र सुरु केले आहे. त्यात मुंबईचा समावेश आहे. 2015 पर्यंत भारतात आंतरराष्ट्रीय वित्तीय निकष असलेले लेखापरीक्षण नियम येणार असल्याने असे प्रमाणपत्र असलेल्या मनुष्यबळाची गरज वाढणार आहे. आम्ही देत असलेले प्रमाणपत्र जागतिक दर्जाचे असल्याने उमेदवाराला परदेशात प्लेसमेंट मिळू शकते.
नेस वाडियाचे प्राचार्य एम. एम अंदार आणि सिम्बॉयासिसचे प्राचार्य ऋषिकेश सोमण यांनी या कराराचे स्वागत केले आहे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.